पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५) करण्यास तयार झाला आहेस खरा; परंतु मी तुझे हर प्रकारे संरक्षण करण्यास समर्थ आहे. तेव्हां,तुझा प्रयत्न व्यर्थ होईल. करितां, तं आत्महत्येचा नाद सोडून दे. असे सांगून सूर्याने त्यास काही शिलाखंड (दगडाचे तुकडे ) देऊन सांगितले की, हे जे शिलाखंड मी तुला दिले आहेत, ते यःकश्चित् दगडाचे तुकडे आहेत असे समजू नकोस. हे दिसावयाला दगडाचे तुकडे दिसतात खरे; परंतु यांचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. वस्तुतः पाहतां हे दगडाचे तुकडे नसून, ही तुझी हयारे आहेत, असे तूं समज. ह्या दगडाचा ज्यावर प्रहार करशील तो तत्काळ नष्टबल होऊन मृत्यूचे स्वाधीन होईल. या प्रकारे सूर्याने आपल्या मुलाचे समाधान करून व त्याला आपल्या संरक्षणाकारतां शिलाखंडरूप शस्त्रास्त्रे देऊन तो अंतर्धान पावला. आदित्याने झणजे सूर्याने त्या मुलास शिला दिल्या ह्मणन जो वर प्रकार सांगितला त्यावरूनच त्याला 'शिलादित्य' हे नाव पडले. शिलादित्याने आपणास बापाने दिलेल्या दगडांचा अनुभव पाहण्याकरितां वल्लभीनगरांतील एका मनुष्यावर त्या दगडांपैकी एकाचा प्रहार करून पहिला. प्रहार करण्याबरोबर तो मनुष्य तत्काळ मरण पावला. मनुष्यहत्या केल्यामुळे वल्लभीनगरच्या राजाचा शिलादित्यावर कोप झाला; व त्याला धरण्याकरितां त्याने आपले काही लोक पाठविले, परंतु, शिलादित्य त्यांच्या हाती लागेना. हे वर्तमान राजाला समजल्यावर त्याने शिलादित्यास धरण्याकरितां आपण स्वत: नाण्याचा निश्चय करून तो निघाला. आपणास पकडण्याकरिता खुद्द राजा येतो आहे असे पाहून शिलादित्याने त्याजवर एका दगडाचा | प्रयोग केला. त्या पाषाणाचा प्रहार होण्याबरोबर राजा गतप्राण झाला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी शिलादित्य सराष्ट्र देशाचा राजा झाला. तो सुराष्ट्र देशाच्या गादीवर बसल्यानंतर सूर्याने त्यास, वायुनुल्प ज्याचा वेग आहे असा, एक आकाशगामी उमदा घोडा दिला होता. त्या घोड्यावर बसून शिलादित्य नेहमी आकाशांत फिरत असे, अशी दंतकथा आहे. शिलादित्य हा मूळचा जैनमतानुयायी होता; परंतु पुढे त्याने बौद्धधर्माची दीक्षा घेतली. याविषयों जैन ग्रंथांत असे लिहिले आहे की, एके वेळी बुद्धाचार्य साधु वल्लभी नगरीत आले; आणि त्यांनी शिलादियास कळविले की, जैन साधु श्वेतांबरी यानशी वादविवाद करण्याची