पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सूर्याने जिचा अंगिकार केला त्यापेक्षा तिचे व तिच्या मुलांचे संगोपन कसे होत होते ? हा प्रश्नच नको. मुलगा थोडा जाणता झालासे पाहून सुभगेने त्यास विद्याभ्यासाकरितां शाळेत घातले. शाळेत काय ? बारा घरची बारा मुले ! त्यांनी सुभगेच्या मुलाचा उपहास करून त्याला "निवान्या" असे ह्मणावे; व तुझा बाए कोठे आहे ? असे नेहमी विचारून विचारून त्यास त्रासवावे. त्या मुलाला शाळेतील सोबत्यांचा उपहास, निबाप्या " नावाने हाक मारणे, व " तुझा बाप कोठे आहे ? " ह्या प्रश्नाचे एकसारखें टुमणे असह्य होऊन, ह्या सर्व गोष्टी आईला सांगून, तिजपासून सर्व खलासा करून घ्यावा असा विचार करून, एके दिवशी 'त्याने आपल्या आईजवळ गोष्ट काढली; आणि आपल्या प्रत्यही होत असलेला त्रास तिजला कळवन, मला माझे सोबती निवाघ्या" ह्मणतात याचे कारण काय ? हणन विचारले. मुलाचा प्रश्न ऐकून सुभगेला अत्यंत खेद झाला; परंतु उपयोग काय ? तिने मोन्या कष्टाने मुलाची कशी तरी समजूत करून त्यास सांगितले की, बेटा, तुला तुझ्या सोब. त्यांनी किती जरी हिणविले तरी तूं चिडत जाऊ नकोस, व प्रत्युत्तर हणून देऊ नकोस. आईचे हे गुळमुळील समजुतीचे बोलणे ऐकून मुलाचे बिलकूल समाधान न होता, त्यास अधिकच वेष आल्यासारखे शाले. मला माझे शाळेतले सोबती उपहासबोधक शब्दांनी जे नेहमी टोचतात व निबाप्या " ह्मणतात ह्यांत काही तरी तथ्यांश आहे, व त्यामुळे मी हीनजातीचा आहे ह्यांत संशय नाही, असा त्याचे मनाचा पूर्ण ग्रह होऊन, त्यास इतकें कांही परमावधीचे दुःख झाले की, त्या दुःखाचे भरांत त्याला आपला जीवही नकोसा झाला. अतभर सोबत्यांना किंवा आईला हे तोड दाखवावयाचे नाही, असा त्याने निश्चय करून, तत्काल अरण्याची वाट धरिली. आपला मुलगा जिवावर उदार झाला आहे असे त्याच्या सर्वसाक्षी बापा (सूर्या) ने पाहुन त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले; आणि समाधान केले की, मुला, तूं कांही काळजी करूं नकोस. तुला तुझे सोबती में "निबाप्या" ह्मणतात तें एक प्रकारे खरे आहे; परंतु, त्या मढ मलांना माझी कृति माहित असण्याचा संभव नाही, त्यांच्या उपहासाने तूं आपल्यास खेद होऊ देऊ नकोस. मी तुआ बाप आहे. तूं ह्या अज्ञ जनांच्या उपहासाने संतापून आत्महत्या