पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) राज्योपभोग अवधा४५ वर्षेच केला. भट्टार्क यांचे राज्य प्रजेला फार सुखावह होते. भट्टार्क हा सेना पति होता ह्मणन वर एके ठिकाणी मोघम मटलेले आहे; परंतु हा क्षात्रप राजांपैकी एकाचा सेनापति असावा असे अनुमान आहे. क्षात्रप हा शब्द "सात्रप" या ग्रीक शब्दाचा अपभ्रंश असावा. क्षात्रप राजानंतर गुप्तवंशीय राजे सुराष्ट्र देशांतन नाहीसे झाले. गुप्तवंशीय राजे शेवटी शेवटी आपणास महाराज असे उपपद लिहूं लागले होते. शत्रुजमाहात्म्यांत, शिलादित्य राजा संवत ४७७ मणजे इसवी सन ४२० त झाला असे लिहिले आहे, व ह्या गोष्टीस ताम्रपटांचेही प्रमाण |मिळते. शिलादित्याचे उत्पत्ती विषयों व त्यास शिलादित्य हे नांव कसे | पडले, याविषयी रासमाळा ग्रंथांत फार्बस साहेबांनी येणेप्रमाणे हकीकत लिहिली आहे: खेडा येथे देवदिय नांवाचा एक वेदविद्यापारंगत असा ब्राह्मण रहात | असे. ह्या ब्राह्मणाला सुभगा नांवाची रूपयावनसंपन्न अशी एक कन्या होती. सुभगेचा पाते तिच्या बाल्यावस्थेतच निवर्तल्यामुळे ती सदा सर्वकाल दुःखी व हिर्मुष्टी असे. अशा प्रकारे सुभगा आपले तारुण्याचे आयुष्य संकटांत व दोन स्थितीत कंठीत असतां, एके समयीं तिला अकस्मात सूर्याचे आराधन करण्याची स्फूर्ति होऊन, तिने सू. योचे अनुष्ठानास प्रारंभ केला. नियमित कालपर्यंत अत्यंत निष्ठेनें व | एकाग्रतेने अनुष्ठान झाल्यामुळे सूर्यनारायण संतुष्ट झाला; व त्याने मनुष्यरूप धारण करून तिला वरिली. त्या मनुष्यरूपी सूर्यपतीच्या संयोगाने सुभगा गर्भवती झाली. ही व्यभिचारजन्य सुभगेची गर्भोत्पत्ति तिचे मातापितरांचे लक्षात आल्याबरोबर त्यांणी तिला घरांतन हांकून दिले. प्रत्यक्ष मातापितरांनी धिःकारपूर्वक अव्हेर केल्यावर मग तिला गांवांत तरी कोण विचारतो ? सभगेर्नेही, ज्यांनी आपल्यास जन्म दिले त्या आईबापांनी आपला त्याग केला, तेव्हां आतां ह्या गांवांत राहून तरी काय उपयोग ? ग्रामांतरावांचून आपल्याला गत्यंतर नाही, असा विचार करून, ती बल्लभी नगरीत जाऊन राहिली. कालांतराने | तिच्या गर्भाचे नवमास परिपूर्ण होऊन तिला एक कन्या व एक पुत्र असे जुळे झाले. दिवसमासांनी कन्या पुत्र मोठी झाली. ज्यापेक्षा प्रत्यक्ष