पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होता. चक्रपालित सुनेदाराच्या कारकीर्दीत सुदर्शन तलावाची पाळ फुटली होती. पाळ फुटण्याचे कारण असे सांगतात की,सवर्ण रेखा नदीस भयंकर महापूर आला होता. त्या पाण्याच्या जोराने सदर तलावाची पाळ फुटली. त्या वेळेस ती फुटलेली पाळ, चक्रपालित सुभेदाराने मोठ्या हुशारीने क अत्यंत त्वरेने दुरुस्त केली. स्कंधगुप्त राजाचे सैन्य त्याचे पश्चात् हतबल झाल्यामुळे भट्टार्क नांवाच्या सेनाधिपतीने आपला अम्मल सुराष्ट्र देशांत बसविला. भट्टार्क याने आपली राजधानी वल्लभीपूर नगरीत केली होती, अशाबद्दलचा उल्लेख, याने ग्रहणादि प्रसंगी कितीएक दाने केल्याबद्दलच्या ताम्रपटावरच्या ज्या कित्येक सनदा सांपडतात, त्यांत सांपडतो. ह्या सनदांत मोघम " संवत" इतकीच अक्षरे आहेत; परंत शालिवाहानाच्या किंवा विक्रमाच्या नांवाचा यांत खुलासा केलेला नाही. परंतु तो काल शकनपकालाचा असावा असा अजमास आहे. या ताम्रपटांवरील सनदांवरून एक वंशवृक्ष सांपडतो. तो येणेप्रमाणे: सेनाधिपति मट्टार्क. धरसेन. ध्रवसेन. धरपट. [शके ३१०] गुहसेन. धरसेन. शिलादित्य ऊर्फ धर्मादित्य. खरगृह. डेरभट. ध्रुवसेन. शिलादित्यदेव. वालादित्य. [शके ३ ४५] धरसेन. या वरील वंशवृक्षावरून असे समजते की, भटार्क यांच्या वंशजांनी