पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) १६ राज्ञो महाक्षत्रप रुद्रसेन याचा पुत्र राज्ञःक्षत्रप विश्वासिंह १ ८८इसवीमंस र. १६ राज्ञःक्षत्रप रुद्रसेन याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप अनुदामा२१०इसवीनंतर. २७ स्वामो जिनदास याचा पुत्र राज्ञःक्षत्रप रुद्रसेन २१० इसवीनंतर, १८ राज्ञःक्षत्रप अतदामा याचा पुत्र राज क्षत्रप विश्वसनसिंह २१७ इ. नं. १९ राज्ञःक्षत्रप रुद्रसेन याचा पुत्र राज्ञःक्षत्रप आशादामा २६ (इसवीनंतर. २० राजो महाक्षत्रप रुद्रदामा याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप स्वामी रुद्रसेन २९२ इसवीनंतर. २१ स्वामी सत्यसेन याचा पुत्र स्वामी रुद्रसेन २९२ इसवीनंतर ही वर दिलेली नांवे त्या वेळचे जे शिके व नाणी उपलब्ध आहेत, त्यांवरून सांपडतात. त्या वेळेस नाण्यांची अशी तव्हा असे की, एका वाजवर राजाचा चेहेरा व दुसऱ्या बाजूवर याचे नांव असून, याचेखाली शक लिहलेला. असे, ही नांवे शक नपकालास आरंभ झाला तेव्हांपासून २९२ वर्षांपर्यंत सांपड़तात, व हा सर्व शोध प्रसिद्ध डाक्टर भाऊदानी यांणी केला. उश्वदात राजाने आपल्या हातच्या लेखांत ४२ वा शक घातला आहे. जयदामा राजाचे नांव, जसदन येथे एका तलावावर कोरलेला एक लेख आहे, त्यांत आहे. या लेखांत शकाचा आंकडा १२७ आहे. ह्या तलावावरील लेखांत पांच राजे सांपडतात. त्यांची नावे:-चष्टन, जयदामा, रुद्रदामा, रुद्रासिंह, रुद्रसेन, याप्रमाणे आहेत, या शकराजांचें राज्य ३०० वर्षे चालले. पुढे त्यांचे राज्य बुडाले, तरी शकनपकालानेच वर्षे गणावयाची पद्धति कायम राहिली. अकरावे इसवीपर्यंतचे लेखांत शककर्ता शालिवाहन याचे नांव कोठेही सांपडत , नाही. त्यानंतर मा. ळव्याचा राजा शालिवाहन नांवाचा होता, याचे नांव शकनपाला लावून दिले असे दिसते. शकनृपकालापुढे ३०० वर्षांनी गंगा व यमुना नद्यांचे तीरी गुप्तराजे राज्य करीत होते असा दाखला मिळतो. गुप्तराजांनी शकराजांस नि:शक्त करून टाकले. गुप्तराजांपैकी, कुमारगुप्त नांवाच्या राजाने सुराष्ट्र देशापर्यंत आपला अंमल बसविला होता. याचा पुत्र स्कंधगुप्त राजा होता. जनागडास जेधे रुद्रदामा राजाचा हातचा लेख आहे त्याचेच शेजारी स्कंधगत राजाच्या हातचा एक लेख आहे. त्यावरून असे समजत की, पूर्णदत्त याचा मुलगा चक्रपालित यास सुराष्ट्र देशाचा सुभेदार केला