पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) ब्राह्मणांस धर्मादाय ह्मणून सोळा गांव इनाम दिले. हा राजा प्रतिवर्षी लक्ष संख्याक ब्राह्मणांस भोजन घालीत असे अशी याची ख्याति आहे, प्रभास क्षेत्रांत ज्यानें गरीब ब्राह्मणांच्या कन्यांची लग्ने करून दिली., ज्याने भडोचेस व नाशिकाजवळ गोवर्धन नांवाच्या पर्वतावर व सोपारामध्ये जलाशय व धर्मशाळा बांधिल्या, ज्याने ठिकठिकाणच्या नद्यांस घाट बांधिले, या राजानें नासिकचे लेखांत नाहपान राजाचे ४५ वे वर्षी आपला लेख स्थापला. इसवी सन १६० झणजे शके ७२ मध्ये उज्जनास स्वामी चष्टन नांवाचा राजा राज्य करीत होता. यास प्रमाण असे सांपडते की, पा मिसर देशाहून तालमी नांवाचा एक मनुष्य भूगोलाचा शोध करीत करीत दुसरे शतकांत इकडे आला होता. त्याणे नद्या, पर्वत, शहरे व गांवें प्रथम लिहन, नंतर त्यांचे नकाशे केले व त्यांचे अक्षांश लिहन काढले. याणे आपले एके लेखांत स्पष्ट लिहिले आहे की, शके ७२ त उज्जनीत चष्टन राजा राज्य करीत होता. रुद्रदाम्याच्या जुनागडच्या लेखांतही हेच नांव सांपडते. या चष्टन राजानंतर जे राजे झालेले सांपडतात त्यांची नांवनिशी खाली लिहिल्याप्रमाणे:२स्वामी चष्टन २ राज्ञःक्षत्रप स्वामी जयदामा, मा ३ राज्ञो महाक्षत्रप जयदाम्याचा पुत्र महाक्षत्रप रुद्रदामा. ४ राज्ञो महाक्षत्रप रुद्रदामा याचा पुत्र महाक्षत्रप रुद्रसिंह १०२ इसवीपूर्वी. ५ रुद्रसेन आणि श्रीसेन सन १२८. ६ राज्ञो माहक्षत्रप रुद्रसिंहाचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप रुद्रसेन १३२इसवी पूर्वी. ७ राज्ञो महाक्षत्रप रुद्रसिंहाचा मुलगा राज्ञो महाक्षत्रप संगदामा १४६. नं. ट राज्ञो महाक्षत्रप रुद्रसेन याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप दामजटश्री१५८इ.नं. ९ राज्ञो महाक्षत्रप रुद्रसिंह याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप दामसेन१५८इ.नं. १० राज्ञो महाक्षत्रप दामसेन याचा पुत्र राज्ञःक्षत्रप वीरदामा १६४ इ. नंतर. ११ दामसेन याचा पुत्र यशदामा... १२ राज्ञो महाक्षत्रप दामसेन याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप विजयसेन १६८इ.नं. १३ राज्ञो महाक्षत्रप दामसेनाचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप दामजटश्री १७८३.नं. १४ राज्ञः क्षत्रप वीरदामा याचा पुत्र राज्ञो महाक्षत्रप इंद्रसेन १८८६. नंतर.