पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूरचे राजे जैन लोकांस अनुकूळ झाल्यानंतर, ब्राह्मण लोक शकनप नांवाच्या संवत्सरानें जो व्यवहार करीत असत तो सर्व विक्रम नावाच्या संवताने करू लागले. हेमाचार्य आदिकरून जैन पंडितांस जेव्हां शकाचा उल्लेख करण्याचा प्रसंग येई तेव्हां ते विक्रम या नांवानेच तो करीत असत ; आणि जैन व्यापाऱ्यांचीही, आपल्या कीर्दखतावणी वगैरे जमाखर्चाच्या कागदांवर विक्रमसंवत घालण्याची वहिवाट असे. परंतु, वराहमिहीर वगैरे ज्योतिःशास्त्रज्ञ पंडित शकनप नावाच्या संवत्सरानेच सर्वे व्यवहार करीत असत असें वर लिहिलेच आहे. शककर्ता विक्रम राजा कधी झाला, तो कोण होता, त्याची मूळपीठिका काय, वगैरे गोष्टींचा नीटसा शोध अद्याप लागला नाही. तथापि, महाविख्यात, परमोदार, पराक्रमशाली व परदुःखाने दुःखित होणारा जो विक्रमराजा त्याच्या मागून हा शककर्ता विक्रमराजा झाला असावा असा सुमार आहे. शक लोक पहिल्या शतकांत जे एकदां काठेवाडांत व पंजाबांत गेले ते तेथेंच वस्ती करून राहिले. शक लोकांस या प्रांतांत 'इदोसीधिया" असें नांव पडले होते. ह्या लोकांची ही नांवे, पाताळांतून उखामंडलांत नाग व तक्षक लोक जेव्हां आले तेव्हांपासून पडली; व ह्याच नाग वगैरे लोकांनी कावे लोकांपासून द्वारका घेतली, असे काही ग्रंथांत लिहिले आहे. ज्या ग्रंथांतून ही माहिती मिळते त्याच ग्रंथांवरून असे समजते की, नाग, तक्षक वगैरे नांवाचे जे लोक ते शक लोकच होत. प्रभासखंडांत असे लिहिले आहे की, शाकल देशांत सूर्याच्या सासन्याने त्यास शस्त्र प्रहार केला ह्मणून सूर्याने आपले तेज शाकल देशावर टाकले; व तेव्हांपासून शाकल देशास प्रभास असे नांव पडले. यावरून इतकेच समजवयाचें की, सर्यवंशी लोकांस शक लोकांनी शस्त्राच्या साहाय्याने हांकून दिले, तेव्हां ते प्रभासास येऊन राहिले. पुढे शक लोकांनी मालव, कट, अनोपदेश, सुराष्ट्र वगैरे देश हस्तगत करून, यांत ते आपला अंमल गाजवू लागले. शकलोकांच्या मुख्य राजाचें नांव नाहपान असे होते. त्याणे नासिकाजवळच्या लेण्यांत पुष्कळ लेख कोरले आहेत, त्यांवरून असे समनते की, नाहपान राजा क्षत्रप असून, उश्वदात्त राजाचा हा पितामह होय. ह्मणजे, उश्वदात्त राजाचा बाप जो दिनीक तो नाहपानाचा जा. मात होता. नाहपान राजाने बनास नदीचे तीरी सूवर्णदान करून,