पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८) की, भावडशा नावाच्या राजाने विक्रमास मयुवती ( महुवा ) नावाची नगरी इनाम दिली होती. भावडाचा मुलगा जावड याणे शत्रुज क्षेत्रांतून म्लेंच्छांस हांकून दिले. ह्या जयाच्या आनंदप्रदर्शनार्थ शत्रुजच्या डोंगरावर एक टोलेजंग उत्सव करण्याचे जावडाच्या मनांत फार होते; परंतु काही अनिवार्य कारणाने त्याच्या मनांतील तो हेतु सिद्धीस गेला नाही; त्यामळे त्याची फार निराशा झाली. जावडाच्या ह्या निराशेवरून त्या प्रांतांत भा. वड जावड...." अशी एक म्हण पडली असून, ती, कोणाची एखाद्या कामांत निराशा झाली असतां अद्याप उपयोगांत आणितात. विक्रम नांवाचे राजे हिंदुस्थानांत पुष्कळ होऊन गेले. शत्रुजमाहा. स्म्यांत महावीर स्वामींनी वर्तवून ठेविलेले भविष्य लिहिले आहे. त्यांत महावीर स्वामी ह्मणतात की, माझे मरणानंतर ३ वर्षांनी पांचवा आरा येईल, व धर्माचा लोप होऊन सर्वत्र झोटिंग बादशाही सुरू होईल. नंतर ४६६ वर्षांनी विक्रमादित्य नांवाचा राजा होईल, तो सिद्धसेन नांवाच्या साधूचे उपदेशाप्रमाणे वर्तन करून माझ्या नांवाचा, ह्मणजे महावीर नांवाचा,संवत बंद करून, आपल्या नांवाचा ,ह्मणने विक्रम नांवाचा, संवत चाल करील.* शत्रुजमाहात्म्यांतील या भविष्यलेखावरून असे दिसते की. महावीर स्वामीच्या निर्वाणानंतर ४७० वर्षांनी विक्रम संवत चाल झाला, आणि महावीर संवत बंद पडला. परंतु,जुने लेखांत दहावे शतकापर्यंत हा विक्रम संवत कोठे आढळत नाही. शत्रुजमाहात्म्यांत कुमार. पाळाची एक कथा आहे, तिजवरून शत्रुजमाहात्म्य हा ग्रंथ अकरावे शतकापुढे लिहिला गेला असावा असे दिसते. वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भेटायल,भास्कराचार्य वगैरे प्रसिद्ध ज्योतिश्शास्त्रज्ञ पंडित आपल्या लेखांतून शकनृप संवत्सर लिहीत होते. यावरून अकराव्या शतकांत अन्हिल अस्मन्निर्वाणतो दर्षेत्रिभिः सार्दैश्च मासकैः। धर्मविप्लावकः शक; पंचमारो भविष्यात॥ ततः शनैश्चतुर्भिः षट्षष्ठिभिवत्सर्दिनः । पंचचत्वारिंशतापि (१) विक्रमार्को महोमिमाम् ॥ सिद्ध सेनोपदेशेनानृणीकृत्य जिनो क्तवत् । अस्मत्संवत्सरं लुप्वा स्वीयमाविष्कारिष्यति ।