पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माणे याने कितीएक स्वप बांधले.या स्तूपांपैकी हल्ली ने स्तूप क्वचित् ठिका. नी सांपडतात त्यांत, अनेक प्रकारच्या चमत्कारिक पदार्थानी भरलेल्या दगडी पेट्या व शिलालेख दृष्टीस पडतात. हे शिलालेख पालीभाषेत आहेत, व त्यांत कचित स्थली कनिष्क राजाच्या नांवाचा उल्लेख केलेला आ. डळतो. कनिष्कराजा इसवीपूर्वी ७३ वर्षांत झाला असावा, असा सुमार 'आहे. शकलोकांची नीट नावाची एक टोळी पुढे हिंदुस्थानांत येऊन, तिने येथे वस्ती केली. तिचे वसतिस्थानास सीस्थान किंवा शक स्थान असे मणवात. शकलोकांस पंजाबांत जित, काठेवाडांत जेटवा आणि राजपुतान्यां. त जाट अशा निरनिराळ्या संज्ञा आहेत. पंजाबत पूर्वी शाकल नांवाचे एक शहर होते. तेथे मिलिंद नांवाचा राजा राज्य करीत होता. या राजाने बौद्धधर्मीयांशी वादविवाद करून, बौद्ध अहंतांस आपल्या राज्यांतून कादन दिले. मिलिंदुराजाने बुद्धांस आपल्या राज्यांतून बाहेर घालविल्या. नंतर ते हीमावत देशांत रक्षितोताल याजकडे गेले; व नागार्जुन नांवाच्या साधूस बरोबर घेऊन, पुनः मिलिंदु राजाशी वादविवाद करण्याचा निश्चय करून, त्याच्या राज्यांत आले. निश्चयाप्रमाणे त्यांनी मिलिंदूशी भवति न भवति करून त्यास पराजित केले. पुढे हे लोक काश्मीरास गेले, व तेथील राजास त्यांनी बौद्धधर्माची दीक्षा दिली. काश्मीरच्या राजाची बौद्धधर्मावर इतकी कांही परमावधीची श्रद्धा बसली की, त्याने आपल्या खर्चान, बौद्धधर्माचा प्रसार करण्याकरिता, तिबेटांत पांचशे बौद्ध तांत पाठविले. तिबेट देशांतील ग्रंथांत असे लिहिले आहे की, हा कीर्तिमान व धर्मनिष्ठ राजा उत्तर-हिंदुस्थानांत कपिलनगरीत राज्य करीत होता ही कपिलनगरी रोहिलखंडांत हरिद्वाराजवळ होती. हा राजा १२० इसवी सनापूर्वी झाला. त्याच्या नंतर सुमारे ४०० वर्षांनी बुद्धावतार झाला. मारवाडांतील घेलाटी रजपत आपल्यास बल्लभीपूरच्या राजाचे वं.. शज ह्मणवितात. वल्लभीपरच्या राजवंशांत कनकसेन ह्मणून एक राजा होता तो व नुक्ताच वर सांगितलेला कनिष्क राजा हे दोन्ही एकच; आणि सुराष्ट्र देशांत कनकावती अथवा कनकपुरी नांवाची जी एक नगरी होती ती याच राजाने वसविली असे ह्मणतात.जाटांचे लेखांत असे लिहिले आहे की, कनकसेन राजाचे पूर्वी परमारवंशीय राजांचे राज्य होते, व याच परमार वंशात विक्रम नांवाजा राजा झाला. शत्रुजमाहात्म्यांत असे लिहिले आहे