पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा अलेक्शा या असावी असे वाटते. प्रसिदेशांतील पायथागोरस,* लेटो, अरिस्टाटल वगैरे प्रसिद्ध ग्रंथकारांची मते बौद्धधर्माशी मिळतात. यावरून ती मतें हिंदस्थानांतून ग्रीस देशांत गेली असावीत असे वाटते. अशोकराजास पुष्कळ पुत्र होते. अशोकाच्या मागे त्याचे राज्य त्याच्या मुलांनी वांटून घेतले. त्यांत सुयशस् नांवाच्या मुलाचे वाटणीत पाटलीपुत्र नगर गेले. काश्मीरचे राज्य जलोक नांवाच्या पुत्राकडे गेले. जलोक हा ब्राह्मणधर्मी होता. कलप नांवाचा एक मुलगा होता, त्याजकडे पंजाबच्या राज्याचा वाटा आला. रहनमन नांवाच्या मुलाच्या वाटणीस ब्रम्हदेशचे राज्य गेले. रहममनाने ब्रम्हदेशांत आवा हे आपल्या राजधानीचे शहर केले. अशोकराजाच्या वर लिहिलेल्या पुत्रांपैकी कलप नांवाच्या मुलाचा संपत्तिराज ह्मणन एक पत्र होता. त्याने आपल्या अमदानीत सहस्रावधि जैनमंदिरे बांधिली. त्याचप्रमाणे गिरनार येथे भीमकुंडावर एक देऊळ आहे, तेही संपत्तिराजानेच बांधिले, असे जैनग्रंथांत लिहले आहे. गिरनार येथील त्या देवळास कित्येक लोक "खिंगाराचा महाल" असे ह्मणतात. अशोकराजाच्या एकछत्री राज्याचे वर लिहिल्याप्रमाणे जरी अनेक विभाग झाले होते, तरी त्याने घालून दिलेला, बौद्धधर्माचा विस्तार कसा

  • पायथागोसस हा एक विख्यात ग्रीक तत्वज्ञानी होता. ह्याने त्या शास्त्राचा अभ्यास ईजिप्टांत केला. पुढे हा हे शास्त्र रोममध्ये व दसऱ्या कित्येक शहरांमध्ये वि. द्याथ्योस शिकवू लागला. ह्याजजवळ अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यास पांच वर्षे मौन घरावे लागत असे; व नंतर अपिले सर्व वित्त सार्वजनिक भांडारांत ठेवावे लागत असे. सूर्य हा ग्रहमालेचा मध्यबिंदु असून, पृथ्वी व इतर ग्रह त्याजभोवती फिरतात, हे मत ह्यानेच प्रथम स्थापन केले. ह्याने मांस खाण्याचा निषेध केला होता व आत्मा एका कुडीतून दुसऱ्या कुडीत जातो, असें ह्याचे मत होते.

प्लेटो हा सुप्रसिद्ध प्रीक तत्वज्ञानी, साकेटीस ह्या महाविख्यात तत्वज्ञाचा शिष्य होता. इसवी सनापूर्वी ३९९ व्या वर्षी तो अतिावख्यात शहाणा पुरुष मरण पावल्यानंतर ज्ञानप्राप्तयर्थ प्लेटो निरनिराळ्या देशांत हिंडला. ह्याने गणित. शास्त्राचा पुष्कळ अभ्यास केला. पुढे हा आथेन्स शहरी येउन राहिला, व तेथें वि. द्याथ्यास तत्वज्ञान व नीतशास्त्र शिकवीत त्याने आपले आयुष्य घालविलें.' आरिस्टोटल हा सुप्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञानी आलेक्झांडरचा गुरु होता. ह्याने प्लेटोजवळ तत्वज्ञामाचा मोठ्या परिश्रमाने अभ्यास केला. (मरण काल खिस्तापूर्वी ३२३,