पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ALSAssionerb चालत असत. बौद्धधर्मात जातिभेद नव्हता; त्यामुळे कोणत्याही जातीतला मनुष्य ह्या धर्मात सामावत असे. मात्र, त्या मनुष्याने एकवार खरा पश्चात्ताप दर्शविला व त्याचे मन पूर्णपणे आपल्या धर्माकडे ओढा घेत आहे असे बुद्धाचार्य व बद्धसाधु यांच्या लक्षांत व प्रत्ययास आले झणजे ते त्यास आपल्या धर्मात घेत. धर्माचे बंदोबस्ताकरिता प्रांतों प्रांती धर्मस्वामी फिरत असत. तिस्थान देशाबाहेर जे धर्मप्रचारक जात असत त्यांस अशोकराजा आपण स्वतः निवडून पाठवीत असे. बापाच्या विद्यमान स्थितीत अशोक उज्जनीत राज्य करीत असतां त्याने तेथील एका सावकाराच्या कन्येशी लग्न केले होते. त्या मुलीपासून अशोकास महेंद्र नांवाचा मलगा व संघमित्रा नांवाची मुलगी, अशी दोन अ. पत्य झाली. त्या उभयांनी साधंचा संघ ह्मणजे समुदाय बरोबर घेऊन ती उज्जनीहन सिंहलद्वोपास गेली; व तेथे बरोबरच्या साधुसमूहाच्या साहाप्याने बौद्धधर्माची स्थापना केली. काश्मीर व गांधार देशांत धर्मरक्षित नांवाच्या साधत पाठविले होते. त्याने तेथील बहुत लोकांस उपदेश करून बौद्धधर्मी केले. हिमालयाच्या पायथ्याजवळील भागांत मत्र्यपो आणि काश्यपो अशा दोघां साधंत पाठविले होते ; व यवनदेशांत यौनधर्मरक्षित नांवाच्या साधची नेमणक केली होती. ह्यांशिवाय, अपरांत देशांत व महाराष्ट्र देशांत अनेक साधु पाठविले होते ; व त्यांणी हजारो मनुष्यांस उपदेश करून त्यांना गद्धधर्मानुयायी बनविले. बोद्धधर्मी साधूचे लेख व अस्थि मोठमोठाले स्तूप करून त्यांत ठेवीत असत. अशा प्रकारचे स्तूप अद्यापि पुष्कळ ठिकाणी सांपडतात. ह्या स्तूपांपैकी एक स्तूप, वसईजवळ सोपारे नांवाचे एक गांव आहे, तेथे नुक्ताच सापडला. त्यांत अनेक प्रकारचे पदार्थ व सुमारे दोन हजार वर्षांचा जुना असून जीवंत एक बेडूक सांपडलाह्या स्तपांत सांपडलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ लंकेच्या गव्हर्नराने मागितल्यावरून त्याजकडे पाठविण्यांत आले; शिलोनांत हे पदार्थ गेले तेव्हां तेथील बौद्धधर्मी लोकांनी ठा उत्सव करून विलक्षण थाटाने त्यांची तेथील बुद्धाचे मठांत स्थापना केली. भडोच आणि सिंधुनदीचे बंदराहून मिप्तर देशांतील शि. कंदा बंदराकडे बौद्ध साधु जात असत. बराहिमिहराने आपले ग्रंथांत सिद्धपुरी ह्मणून एक नगरी लिहिली आहे. सिद्धपुरी नगरी शिकंदर्या