पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) गरी व पहाडी लोकांच्या भाषांचा तुरष्क भाषेशी निकट संबंध असून, संस्कृत भाषेशी त्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. यावरून असे दिसते की, हिंदुस्थानांत प्रथम ह्याच असंस्कृत लोकांची वस्ती असावी. कालांतराने वायव्य दिशेकडून संस्कृत भाषा बोलणारे आर्य लोक हिंदुस्थानांत आल्यावर पुढे कालदेशमानाने आर्य लोकांच्या मूळ ( संस्कृत ) भाषेत इतर भाषांचे मिश्रण होऊन, वर लिहिलेल्या, संस्कृत भाषेशी संबंध असणान्या, प्राकृतादि भाषांची उत्पत्ति झाली असावी. आर्य हिंदुस्थानांत आल्यावर पहिल्याने त्यांनी गंगा व यमना ह्या नद्यांच्या तीरांस वस्ती केली:क हिंदुस्थान देशास आपलेच ह्मणजे 'आर्य' असे नाव दिले. आर्यदेशाची दक्षिणसीमा नर्मदा नदी आहे, असे एके ठिकाणी लिहिले आहे. नर्मदेच्या दक्षिणेस म्लेंच्छ लोक रहात असत, ह्मणून त्या बाजूस आ. यांनी जाऊ नये, असे मनूने लिहून ठेविले आहे. परंतु, पुढे दक्षिणेत आर्यांची मोठमोठी तीर्थ व पवित्र क्षेत्रे झाली, तेव्हां तिकडे जाण्याचा परिपाठ पडत जाऊन, सांप्रत तर त्या बाजूस जाण्याचा मुळीच निषेध नाही इतकेच नाही; तर विधि झाला आहे. अशोकराजाचे वेळेस देवनगरी लिपी लिहीत असत. ह्याच लिपीचे रूपांतर होऊन, प्रस्तुतच्या मोडी, गजराथी, बंगाली, उडिया, सिंदी, तिबेटी, ब्रह्मी, बालबोध, मारवाडी, गुरुमुखी वगैरे लिप्या झाल्या आहेत. ह्या लिप्यांशिवाय हल्ली ज्या कित्येक असंस्कृत लिप्या आहेत त्या देवन. गरी लिपीच्याच आधाराने लिहिल्या जातात. हे ने वर लिप्यांचे फेरफार सांगितले ते कीर्तिस्तंभांवर, शिलांवर वगैरे जे शुद्ध देवनगरी लिपीत लिहिलेले लेख आहेत ते पाहिले असतां अंशतः तरी ध्यानांत येण्यासारखे आहेत. कियेक ताम्रपटांवरील, कीर्तिस्तंभांवरील व शिलांवरील लेख अद्यापि तपासावयाचे आणि शोधावयाचे राहिले आहेत. अ. शोकाच्या हातचे लेख चारी दिशांस आहेत, त्यांजवरून त्याचे राज्य हिंदुस्थान देशांत सर्वत्र होते असे दिसते. गिरनार येथील शिलालेखांत अशोकराजास " देवांना प्रिय " व " प्रियदर्शी" अशी विशेषणे दि. ली आहेत. अशोकराजा महावीर असून, अत्यंत दयालु होता. त्याच्या कारकीर्दीत बौद्धधर्माच्या मोठमोठ्या सभा स्थापन होऊन व या धर्माची सर्व सूत्रे एकत्र जमवून बौद्धधर्माचा प्रसार करण्याचे प्रयत्न मोठ्या जारीने