पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) आहे. त्यांत तो लिहितो की, मी प्रजेच्या हिताकरितां मोठमोठे रस्ते, वि. हिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या आहेत; ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या औषधींची झाडे लाविली आहेत; त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता एन्टिओको, यवनराज,चिपतरदेशाचा,नोतुलमाई, मागा, अलकसुनरी ( दुसरा शिकंदर ) अन्टिगोनस* वगैरे राजे अनुकूल करून घेतले आहेत. अशोकाने बौद्धवच्या वृद्धीकरितां जे राजे अनुकूल करून घेतले ह्मणन नुक्तेच सांगण्यांत आले ते अशोकराजाच्या वेळेस खास होते, अशाविषयों ग्रीक लोकांच्या ग्रंथांतूनही प्रमाणे सांपडतात. अशोक हा खराच बौद्धधर्मी होता अशाविषयीं, जयपुरानजीक भाभरा गांवाजवळ त्याच्याच हातचा एक शिलालेख आहे, त्यांत त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यावरून अशोक राजा बौद्धधर्मी होता की नाही याविषयी संशय रहात नाही. दिल्ली, मयुरा, माठिया, राठिया, व आणखी बहुत ठिकाणी अशोक राजाच्या हातचे शिलालेख आहेत. अयोध्येचे उत्तरेस खालसी नांवाच्या गांवांत कीर्तिस्तंभावर अशोकाच्या हातचा एक लेख आहे, त्यांत लिंग. निर्देश न करितां, सामान्य मनष्यमात्रास उपदेश केला आहे की, बाबांनो, सर्व प्राण्यांवर दया करा, कोणास पीडा देऊ नका, आपल्या हातून होईल तितका उपकार करीत जा, वगैरे. ह्या लेखाचा अर्थ करण्याकरितां अकबरादि कितीएक बादशाहांनी देशोदेशींचे अनेकभाषाकोविद हजारो पंडित जमा करून पुष्कळ खटपटी करून पाहिल्या; परंतु त्या खटपटीत कांहींच अर्थनिष्पत्ति झाली नाही. पण, आलीकडे एशिया. टिक सोसायटीचा सेक्रेटरी प्रिन्सेप याणे क्या लेखाचा अर्थ करून, तो अनेक प्रमाणांनी खरा असा ठरविला आहे. हिंदुस्थानांतील प्राकृत ( मराठी ), मागधी (सिंदी), गुजराथी, बंगाली, उडिया, विन,पंजाबी वगैरेचा, संस्कृत भाषेशी पुष्कळ संबंध आहे. तेलंगी, द्राविडी किंवा तामळ, कानडी, मल्याड, गोंड, कोंड, संथाल, तोडा, सयाकोल वगैरे भाषांचे संस्कृत भाषेशी कांही नाते नाही. डों

  • अन्टिगोनस हा, आलेक्झांडरच्या पदरच्या सरदारांपैकीच एक होता. त्या विख्यात बादशहाच्या मृत्यूनंतर ह्याच्या वाटणीस पांपिलिया, लिदीया वगैरे प्रांत आले होते. परंतु अनावर राजतृष्णेने ह्याच्या गळ्यांत माळ घातल्यामुळे, हा एशियाखड जिंकण्यास निघाला. तेथे ह्याच्या व मिलकसाच्या लढाया होऊन हा मारला गेला.