पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्या, पादुकांची दर्शनें घतली, उपदेशकांच्या तीन धर्मव्याख्याने ऐकिली, व धर्मपुस्तके मिळवून चीनच्या बादशाहाच्या परवानगीने त्यांची चिनी भाषेत भाषांतरे करून बरोबर नेली. हे जे लोक इकडे येऊन गेले त्यांनी आपापल्या रोजनिशा लिहून ठेविल्या आहेत. त्या अद्यापि विद्यमान असून, त्यांत पुष्कळ उपयुक्त माहिती सांपडते. सुमारे हजार वर्षांपूर्वी चीनदशांत संस्कृत पाठशाळा स्थापन झाली आहे. ह्या पाठशाळेतन संस्कृत भाषेत पूर्ण परिनिष्ठित होऊन कियेक विद्वान बाहेर पडले आहेत, व अजनही पडत आहेत. आपल्या देशांत (हिं. दुस्थानांत ) आलीकडे जशा परीक्षा होतात, व पदव्या मिळतात, तशा चीनदेशांतील ह्या शाळेत पूर्वीपासून परीक्षा घेण्याचा व ज्यांच्या परीक्षा उत्तरतील त्यांस पदव्या देण्याचा संप्रदाय आहे. संस्कृतविद्यामंदिरांतून जे गुरूपगुरु शिक्षक नेमावयाचे ते आत्पत्वकीय किंवा इतर वशील्याचे न नेमतां, जे परीक्षेत पसार झाले असतील त्यांसच नेमप्यांत येते. परीक्षा उतरल्यावर जे किताब मिळतात ते लाकडाच्या एका फळीवर लिहून, ती फळी घराच्या दरवाजावर लावण्याची चीनदेशांत वहिवाट आहे. अशोकराजाने जे शिलालेख खोदून ठेविले आहेत, त्यांपैकी गिरनार पर्वताच्या पायथ्यावरचा, उडिसा प्रांतांत कटकशहराजवळ धवली गांवांतील डोगरावर चा व काबुलांतील कपर्दी गिरीवरचा हे लेख मुख्य आहेत, हे सर्व लेख जुन्या पल्लवी भाषेत खोदलेले आहेत. त्या वेळच्या राजांच्या शिक्कामोर्तबांवर जी अक्षरे असत तीही ह्याच भाषेच्या लिपीत कोरलेली असत. अशोकराजाच्या हातच्या सर्व लेखांत धर्मानुशासन लिहिले आहे, असें वर सांगण्यांत आलेच आहे. त्यांत हिंसा करू नये, हणजे कोणत्याही प्राण्यास जिवे मारू नये, अथवा पीडा देऊ नये; ब्राम्हणांचा सन्मान करावा: मातापितरांस देवतुल्य मानन, त्यांच्या आज्ञेत वागावें; आप्तस्वकीय व स्वदेशीय जनांचा मान रक्षण करण्याकरिता शटावे; सर्व धर्माचे आचार्य सांगतील ते ऐकन व्यावें; जो धर्म आप. ल्या विचारास उत्तम वाटेल तोच पाळावा; आपल्यापेक्षां कोणासही उ. बनीच समजून, त्याची निंदा करूं नये; प्राणीमात्रावर दया करावी; आणि स्वधने व सुनीति रक्षावी; ह्या अनुज्ञा मुख्य आहेत, अशोकाने आपल्या हातच्या एका शिलालेखांत आपण विशेष काय केले ह्याबद्दल लिहिले.