पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बदल अशोकास यत्किंचितही दु:ख वाटले नाही, हे त्याच्या नामार्थाप्रमाणे अनरूपच झाले! अशोकाच्या हातून हें जें दुष्ट कर्म घडले ते केवळ राज्य लोभाच्या महत्वाकांक्षने घडले. त्याची नैसर्गिक बुद्धि इतकी घातक न. व्हती, हे पुढे लिहिलेल्या कित्येक गोष्टींवरून सहज समजण्यासारखे आहे. अशोकराजा चक्रवर्ती झाल्यावर त्याने राज्य फारच उत्तम रीतीने चालविले. अशोकासारखा राजा पुढे कधीही झाला नाही. सिलोन येथील महावंशांत याची फारच तारीफ केली आहे. गव्हर्नर ज्यान टरनर याणे महावंश ग्रंथाचा इंग्रजीत तर्जुमा केला आहे, त्याजवरून समजते की, अशोकराजा पहिल्याने ब्राह्मणधर्मी होता. तो राज्याभिषिक्त झाल्यानंतर चार वर्षांनी बौद्धधर्मी झाला. असे वाटते की, अशोकानें राज्यप्राप्तीच्या प्रबळ इच्छेने केलेल्या युद्धक्रांत ज्या सहस्रावधि नररूपी यज्ञपशूच्या (मु. ख्यत्वें सहोदर बंधूंच्या) हिंसा केल्या, त्यांसंबंधाने त्यास पुढे पश्चात्ताप होऊन, हा “ अहिंसा परमो धर्न" स्वीकारला असावा. अस्तु. रोमचा बादशाहा कान्स्टन्टाईन* याणे आपल्या राज्यांत जसा खि. स्तीधर्म वाढविला, तसा अशोकाने हिंदुस्थानांत बौद्धधर्माचा प्रसार केला. त्याणे बौद्धधर्माच्या शिक्षेकरितां ठिकठिकाणी कीर्तिस्तंभ व शिलांवर लेख खोदून ठेविले होते, व ते अद्यापिही कायम आहेत. बौद्धधर्माचा उपदेश करण्याकरितां अशोकानें देशोदेशी बौद्धसाधु पाठविले होते. हे बौद्ध साधु चीनदेशांतही गेले होते. त्यांणी तेथील लोकांस आपल्या धर्माचा विलक्षण चातुर्याने उपदेश केल्यावरून कित्येक धार्मिक व विद्वान् चिनी लोक बौद्धधर्म समजून घेण्याकरिता व त्याची पुस्तके पाहण्याकरितां हिटुस्थानांत आले होते. त्यांनी,जेथे जेथे बुद्धांची संस्थाने होती,त्यांच्या पूज्य देवाच्या पादुका होत्या, बौद्धधर्मापदेशक रहात होते, व बौद्धधर्मपुस्तकांचा संरह होता, तेथे तेथे हिंडन, त्या संस्थानांतील सर्व व्यवस्था पाहि

  • कान्स्टन्टाईन ह्या नांवानें पूर्वेचे पुष्कळ बादशाहा होऊन गेले. ह्या सर्वात प्लेव्हस व्हालरिअस या नांवाचा बादशाहा फारच विख्यात होऊन गेला. सन ३१२ मध्ये हा स्वारी करण्यास निघाला असतां, ह्याला आकाशांत एक कास दिसला, व त्यावर काही त्याटिन अक्षरें होती असेंही ह्याला वाटले. म्हणन ह्याने खिस्ती धर्म स्विकारला; व तेव्हांपासून त्या धर्माचा विशेष प्रसार करण्याकडे त्याने फार लक्ष दिले, ह्यानेच कान्स्टान्टिनोपल नांवाचे शहर वसवून, तेथे आपली राजधानी केली,