पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे लिहिले आहे. प्लूटार्क * नांवाचा एक ग्रंथकार होऊन गेला, त्याणे हिंदुस्थानची बखर लिहिली आहे. त्याचप्रमाणे रोम व ग्रीस देशांत फार प्राचीन कालापूर्वी एरियन, स्टायोटीन, वगैरे प्रसिद्ध ग्रंथकार होऊन गेले. त्यांनी आपल्या ग्रंथांत असे लिहिले आहे की, यवनांचा राजा सिलकस याने आपला वकील मेघास्तिनी यास बारा तेरा वर्षे पाटलीपुत्रनगरांत ठेविले होते. सिलकस राजाचा व ग्रीस देशांतील यवनांचा सोयरसंबंध असल्यामुळे सिकूलस राजाचे सैन्यास ग्रीसच्या यवनांचे चांगले पाठबळ होते. चंद्रगुप्त राजाजवळही हत्ती, घोडे व पायदळ मिळून फार मोठे लष्कर होते. पुढे चंद्रगुप्त राजाने सिलकस राजाशी लढाई कशी केली व राज्य कसे मिळावेले ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ह्या ग्रंथकारांचा उल्लेख व इकडील ग्रंथांतून सांपडत असलेला उल्लेख हे परस्परांशी अगदी बरोबर जुळतात. यावरून त्या वेळेस चंद्रगुप्त हाच राजा राज्य करीत होता, असे सिद्ध होते. फक्त अपभ्रंशाने त्याच्या नांवांत फरक पडला, इतकेच काय ते. चंद्रगुप्ताचे राज्य बंगाल, उडिसा, कलिंग, काश्मीर, पंजाब, मारवाड, सुराष्ट्र व मालव इतक्या ठिकाणी होते. मालव व गुजराथ देशांचा राजा कद्रदाना याणे गिरनारपर्वताचे एके खडकावर एक लेख कोरून ठेविल आहे. त्यांत असे लिहिले आहे की, गिरनार मणजे जनागडाजवळ सुदर्शन नांवाचा जो तलाव आहे तो चंद्रगुप्तराजाने अविकृत केलेला | सुभेदार पुष्पगुप्त याने बांधला. चंद्रगुप्ताच्या मागे त्याचा पुत्र बिंदुसार हा आपले बापाचे गादीवर बसला. पप्पगुप्त यास शंभर पत्र होते. त्यांपैकी अशोक हा उज्जनीत राज्य करीत होता, व एक कानीरच्या गादीवर होता. अशोकाने आपल्या सर्व भावांस मारून आपण आपल्या बापाचे सर्व राज्य बळकावन बसला. आपले नब्याणव भाऊ आपल्या हातें मत्युलोकांतून नाहीसे झाले या

  • प्लूटार्क हा एक ग्रीक तत्ववेत्ता व नीतिशास्त्रज्ञ होता, ह्याने मोठमोठ्या पुरुषाची चरित्रेही लिहिली आहेत. प्राचीन काळच्या तत्ववेत्यांत व नीतिशास्त्रज्ञात ह्याची योग्यता फारच मोठी गणली आहे.

स्ट्राबो हा एक ग्रीक भगोलशास्त्रज्ञ होता. ह्याने सीरीया, पालेस्टाईन, ग्रीस व इजिप्ट ह्या देशांतून प्रवास करून भूगोलाची चांगली माहिती मिळविली.