पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठी फौज घेऊन हिंदस्थानांत आला. त्याने सिंधुनदी उतरून पंजायांत आपला अंमल बमविला. शिकंकदरबादशाहाचा,पंजाबाच्या पुढेही जाण्याचा इरादा होता; परंतु, त्याचे लाकर थकल्यामुळे तो निरुपाय होऊन परत गेला. शिकंदस्वादशाहा परत गेल्यावर लवकरच मेला. तो मेल्यानंतर त्याचे राज्य त्याच्या सरदारांनी आपसांत वांटून घेतले. त्या वांटणीत हिंदुस्थानालगताचा सर्व मुलख सिलकसयाजकडे आला. त्या वेळेस मगधदेशांत चंद्रगुप्त नांवाचा राजा राज्य करीत होता. अर्थात हा चंद्रगुप्त राजा इसवी सनाचे पूर्वी तीनशे विसाव्या वर्षी होता, असे यावरून सिद्ध होते. चंद्रगुप्ताच्या राजधानीचे शहर पाटलीपुत्र नगर होय. त्यास हल्लो पटण म्हणतात. हे गंगा व गंडकी ह्यांच्या संगमापासून दोन कोसांवर आहे. एके समयीं गंगानदीस अकस्मात् विलक्षण पूर येऊन त्या पुरांत हे नगर वाहन गेले व त्याचा इतका कांहीं नायनाट झाला की, पर्वी त्या जागेवर पाटलीपुत्र नगर (पटण) होते की नन्हते असे होऊन गेले ! हल्ली त्या जागेवर वस्ती आहे, व तेथे पूर्वकालच्या साक्षीमत अशा मूर्ति वगैरे कांही वस्तु सांपडतात. चंद्रगुप्त राजाची कथा पुराण, बृहत्कथा, मुद्राराक्षस नाटक व जैनग्रंथ ह्यांत सांपडते. काही कालापूर्वी चीनदेशांतून हिंदुस्थान देशांत जे फिरस्ते प्रवास करून गेले त्यांनी लिहून ठेवलेल्या बखरीतही चंद्रगुप्त राजाच्या कथेचा दाखला मिळतो. त्यांत त्यांनी या राजाचे नांव संद्र कोटस (मागील पृष्ठावरुन पुढे चाल.) विजयश्रीचें अलेक्झांडरावर पूर्ण प्रेम असल्यामुळे पोरसास हार खावी लागली. तथापि पोरसाचें गंभीर व बोरोचित वर्तन पाहून अलेक्झांडरास फार कौतुक वाटलें ; व त्याने त्याजशी स्नेह केला. पोरसास जिंकल्यावर अलेक्झांडर थोडा पुढे सरला ; परंतु त्याची फौज अगदी कंटाळून गेल्यामुळे त्यास परतारे लागले. ह्यानंतर तो लवकरच मेला.

  • सिलूकस हा अलेक्झांडराच्या पदरचा एक सरदार होता. अलेक्झांडर मेला त्या वेळी त्याचे राज्य संभाळण्यासारखा त्याचा मुलगा नसल्यामुळे त्याचे राज्य त्या च्या सरदारांनी वांटून घेतले. ह्या वाटणींत सिलकसास बाबिल न प्रांत मिळाला. परंतु, हा शर व मुत्सद्दी असल्यामुळे ह्याने आपलें राज्य बरेंच वाढविलें, ह्याचा हिदुस्थानांतील चंद्रगुप्त राजाशी फार स्नेह होता.