पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आले त्या वेळेस सराष्ट्र देशांत वैत राजा राज्य करीत होता. रैवताची कन्या खेती, श्रीकृष्णाचा वडील भाऊ बलराम यास दिली होती, असे पुराणांत लिहिले आहे. भारती युद्धांत श्रीकृष्ण प्रसिद्ध आहे. भारती युद्ध झाल्यानंतर सर्व यादव प्रभासास गेले; व तेथे आपसांत त्यांचे भांडण लागून युद्ध झालें, व त्या युद्धांत ते सर्व मरण पावले. त्या दुःखाने पीडित होऊन श्रीकृष्ण एका तलावाचे कांठी पिंपळाचे झाडाखाली निजला असतां कोणी पारध्याने त्यास बाण मारला तेणेकरून श्रीकृष्णाच्या देहांतून प्रा. ण नाहीसे झाले. ज्या ठिकाणी हा श्रीकृष्णनिर्याणाचा प्रकार घडला त्या स्थलास देहोत्सर्ग क्षेत्र ह्मणतात. हे देहोत्सर्गक्षेत्र प्रभासक्षेत्राजवळच आहे. पुराणावरून या गोष्टीस पंधरा हजार वर्षे झाली असावीत असे वाटते. कितीएकांचे मत, ही गोष्ट इसवीपूर्वी पंधराशे वर्षांत झाली, असे आहे. श्रीकृष्णनिर्याणानंतर पुढे पुष्कळ कालाचा इतिहास सांपडत नाही. इसवीसनाचे पूर्वी चारशे वर्षे मगधदेशांन सूर्यवंशीय राजे पाटलीपुत्र नगरीत राज्य करीत होते. त्या वेळेस सिंधुनदीचे पलीकडे ग्रीक झणजे यबनांचे राज्य होते. त्यांची व भगधदेशाच्या राजाची मैत्री असे; आणि यवन जातीचा अधिकारी सुराष्ट्रांत मगधाधिपतीकडून सुभेदार होता. इसवीसनाचे पूर्वी ३२० वर्षे ग्रीक लोकांचा राजा शिकंदरबादशाहा* * शिकंदर ह्याचे खरे नांव अलेक्झांडर असें होतें. ग्रीस देशाच्या उत्तरेस मासिडोनिया नांवाचा प्रांत होता, त्यांच्या फिलिप नामक राजाचा हा मुलगा. खिस्ती सनास प्रारंभ होण्यापूर्वी ३३६व्या वर्षी हा आपल्या बापाच्या मागून त्याच्या गादीवर वसला. हा आपलें नांव इतिहासांत चिरकाल राखील अशी ह्याच्या लहानपणापासूनच चिन्हें दिसत होती. बापाने एकादा जय मिळविला आणि मुलख काबीज केला की, ह्याला त्याजबद्दल संतोष न होता, ह्यार्ने ढळढळां अश्रु गाळारू, व म्हणावें की, "माझा बाप सारे मुलख आपणच जिकील; मला जिकण्यास काहीच ठेवणार नाही." ह्याच्या वयाच्या२०व्या वर्षी हा गादीवर बसला;व तेव्हांपासून लढाया करण्याचे व नवीन मुलुख जिंकण्याचे काम याने सुरू केले. प्रथमत: ग्रीवर आपला अधिकार पूर्णपणे स्थापून तो एशियाकडे वळला.ह्या खंडांत त्याने पशियाचा राजा डायस ह्याजशी अनेक लढाया मारून त्याजवर जय निळोवले; व शेवटी त्याचे राज्य आपल्या स्वाधीन करून घेऊन, तो इजिप्त कडे वळला. नंतर तेथन हिंदस्थानावर आला. हिंदुस्थानांत ह्याजशी पंजाबचा राजा पोरस हा लढाईस उभा राहिला; परंतु (पुढे चालू.)