पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| दोघे पुत्र घेऊन बमली आहे असे दाखविले आहे.ऋषभदेवाचे देवळांत नंदी आहे, यावरून नंदी हा शिवाचे व ऋषभदेवाचे वाहन होता,असे त्या वेळचे लोक मानीत होने असे दिसते. गिरनार हे नेमिनाथाचे क्षेत्र आहे.नेमिनाथ हा बाविसावा तीर्थंकर होता. एका जैनग्रंथांत असे लिहिले आहे की, हरिवंशांतील यदुराजाला सौरी व सुवत असे दोन पुत्र होते. सौरीने मथुरेचे राज्य सवताचे स्वाधीन करून, आपण कशावर्त देशांत आला; आणि तेथे त्याने सौरी नांवाचे नगर वसावले. सुवतराजाचा पुत्र भोजकविष्णु, त्याचा पुत्र उग्रसेन, त्याचा पुत्र कंस, अशी परंपरा आहे. सौरीस अंधकविष्णु नांवाचा एक पुत्र होता. त्याचा मुलगा समुद्रविजय हा सौरी शहरांत राज्य करीत असतां त्यास नेमिनाथ हा पुत्र झाला. नेमिनाथाच्या आईचे झणजे समुद्रविजयाच्या बायकोचे नांव शिवा असे होते. नेमिनाथाने सर्वसंगपरित्याग करून गिरनागर पर्वतावर घोर तपाचरण केले व त्याच तपोबलाने तो पुढें तीर्थंकर पदवीस पोहोचला. वरील कथा ज्या ग्रंथांत लिहिली आहे त्यांतच आणखी असे लिहिले आहे की, समुद्राविजयाला वसुदेव नांवाचा एक पुत्र होता. वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण याची व त्याचा मातुल कंस ह्या उभयतांची, कच्छचे सरहद्दीवर पंचासर नांवाचें एक गांव आहे, तेथे लढाई झाली. शवज व गिरनार या क्षेत्रांत जैन लोकांचे मोठमोठे संघ (यात्रा) येतात. मोदपूर नांवाचे जे काठेवाडांत गांव आहे म्हणन वर एके ठिकाणी लिहिले आहे, तेथे श्रीकृष्णाचे लग्न झाले. प्रभासक्षेत्राच्या दक्षिणेस तलशोशाम ह्मणन एक गांव आहे. तेथे ऊन व गोड्या पाण्याची कुंडे आहेत. पोरबंदरास सदामपुरी म्हणतात. त्याचे कारण असे सांगतात की, श्रीकृष्णाने सुदामा (हा श्रीकृष्णाचा सहाध्यायी म्हणजे गरुबंधु होता, असे भारतांत लिहिले आहे.) नांवाच्या एके ब्राम्हणास दरिद्ररहित करून पोरबंदरचा राजा केला. त्याची जी नगरी ती सुदामपुरी असे नांव तेव्हांपासून पडले, व तिचे माहात्म्य वाढत गेले. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास समजण्यास पुराणें व जैनलोकांचे ग्रंथ. आधार आहेत. त्यांवरून सूर्यवंशीय व चंद्रवंशीय राजे ह्या देशांत. राज्य करीत होते असे स्पष्ट दिसते. आनत व रेवत यांची नांवे त्या आ. धारांत सापडतात. ज्या वेळेस श्रीकृष्ण यादवांसहित मयुरेहन द्वारकेस