पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्म फार झपाट्याने वाढत गेला व त्या अवधीत प्रभासक्षेत्रांत सहस्त्रावधि शिवालये होऊन, प्रभास हे शिवपुरी व ज्योतिलिंगाचे स्थान आहे, अशाविषयों प्रगिद्धीस आले. उत्कलदेशांत कटकशहरापासून सात कोशांवर भुवनेश्वराचे एक देऊळ आहे.त्याजवळ आणखी पुष्कळ शिवालये आहेत. मुंबईजवळ घारापुरी, दौलताबादेजवळ कैलास व वेरूळची वगैरे लेणी असून, ती सर्वत्र प्रसिद्ध आहेत. ही लेणी बलभी नगरच्या राजांनी चवथ्या शतकांत कोरली असावी, व हे सर्व राजे पूर्ण शैव असावेत असे आह्मांस वाटते कारण की,ताम्रपटांवर त्या राजांच्या हातच्या ज्या कित्येक सनदा सांपडतात यांजवर महेश्वराचे परम भक्त असे लिहिले असून, खणेकरितां नंदीचे चित्र खोदलेले असते. यावरून त्या वेळचे सर्व राजे निःसीम शेवधर्मी होते, असे स्पष्ट दिसते. शत्रुजय डोंगर पालीठाण्याजवळ आहे.ह्याडोंगरावर जैनलोकातील मूळच साधु आदिनाथ याणे तपाचरण केल्यामुळे ही जागा बौद्ध लोकांचे एक परम पवित्र क्षेत्र बनली आहे. आदिनाथ हा शत्रुजय डोंगरावरच निर्वाण पावला. आदिनाधाला काम देव असे आणखी दुसरे एक नांव होते. त्याला दोन पुत्र होते. एक भरत व दुसरा बहुबल, भरताने पुष्कळ दिवस राज्य केले, व त्यावरून ह्या देशास भरतखंड असें नांव पडले आहे. भरताची राजधानी अपोध्येस होती. त्याने म्लेंच्छ राजाशी युद्ध करून त्यास जिकिले, म्लेंच्छ राजाचा पराभव झाल्यामुळे तो पळाला, व सिंधुनदी उतरून पलीकडे गेला. भरताचा कारभारी सुकन याणे त्याचा पाठलाग करून उत्तरसमुद्रापर्यंत देश जिंकिला. पुढे भरताचा धाकटा भाऊ बहुबल हा म्लेंच्छदेशाधिपति झाला. भरताचा मुलगा सोमेश याणे शत्रुजयपर्वतावर ऋषभदेवाचे एक देऊळ बांधले व सर्व सुराष्ट्रदेशाचे उत्पन्न ऋषमदेवाच्या संस्थानच्या खर्चास लाकून दिले होते, हणन सराष्ट्रदेशास वदेश ह्मणतात, असें शत्रजयमाहात्म्यांत लिहिले आहे. भरताच्या वंशांतील शाक्यासिंह हा सुराष्ट्राचा अधिपति होता. त्याणे आपलेबरोबर मोठे सैन्य घेऊन गिरनारांतून राक्षसांस (त्या वेळचे लोक भयंकर पापकर्मे असल्यामुळे त्यांस 'राक्षस' ह्मणणेच प्रशस्त दिसते. ) हांकून दिले आणि तेथे नेमिनाथ किंवा अरिष्टनेमीचे देऊळ बांधिले. त्या देवळांत हत्तीचें एक दगडी चित्र आहे.त्याजवर ऋषभदेवाची आई मरुदेवी ही आपले