पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रण छोडजीचे देऊळ गुप्तवंशाचे राजानेच बांधिलं, अशाबद्दल प्रमाणभूत स्वतंत्र शिलालेखही सांपडतात. द्वारकोस एक त्रिविक्रमाची मूर्ति आहे. त्रिविक्रम झणजे वामनावतार, हे सर्वश्रुतच आहे. गुप्तवंशांतील राजे वामनाची पूजा करीत असत. जुनागडापाशी व नथली ह्मणनः एक गांव आहे तेथे वामनाचे देऊळ आहे. त्यास पूर्वीचे लेखांत वामनस्थली असें नांव आहे. द्वारकामाहाम्यांत असे लिहिले आहे की, द्वारकेत कुशनामा महापापकर्मा एक वैश्य रहात होता. त्याणे दुर्वासऋषीस पीडा केल्या. वरून ते पाताळांत वामनात शरण गेले; व या दुष्टाच्या तापांतून मला मुक्त करावे, अशी त्यांनी वामनाची प्रार्थना केल्यावरून, वामनाने नागजातीच्या लोकांचे सैन्य दुर्वासास देऊन त्याजकडून कुशासुरास (कुशनामा वैश्याच्या अमानुष कृत्यांवरून त्यास 'कुशासुर' हेच नांव चांगले शोभते!) मारविले; व त्या ठिकाणी कुशेश्वर नांवाच्या शिवलिंगाची स्थापना केली. द्वारकेंत शंख नांवाचा दुसरा एक दुष्ट पुरुष रहात होता.यासच त्याच्या दुष्टकर्माचरणावरून 'शंखासर' असे पुराणांत म्हटले आहे. हा शंखासुर पाताळच्या लोकांकड़न धारतीर्थी मारला गेला. या कथेवरून सिंधुनदीच्या पलीकडील कावे (चौरा, रजपत) किंवा शकलोक या वेळेस त्या प्रांतांत वस्तीस आले असावे; व हे लोक, कितीएक नकाशांत पाताळ नांवाचे एक शहर आढळते, तेथील मूळचे रहिवासी असावेत भूगोलविद्येचे प्रसिद्ध वेत्ते टालमी व एरियन यांणी आपल्या भूगोलवर्णनांत पातालशहर शकलोकांकडे होते असे लिहिले आहे. पुराणांत पातालामध्ये तक्षक आहे म्हणूण लिहिले आहे. यांतील तक्षक शब्दावरून सर्पजातीचे अनुमान करण्याचा पाठ पडला आहे.परंतु,या अनुमानापेक्षां पातालांत तक्षक जातीचे लोक होते असे अनुमान करणे सयुक्तिक दिसते. तिबेटांतील ग्रंथांतही पातलशहर शक लोकांकडे होते असे लिहिले आहे. कालांतराने शकलोक पातालशहर सोडून कपिलवास्तु येथे आले. तेथे सातवा बुद्ध शाक्यसिंह हा जन्मला. उश्वदात्त राजाने दुस-या शतकांत नाशिकापासून जवळच एका डोंगरांत लेणी कोरली आहेत. ह्या लेण्यांत एक शिलालेख आहे, त्यांत प्रभास है पुण्यभूमि असल्याविषयीचा खलासेवार उल्लेख केला आहे. प्रभासक्षेत्रांत समुद्रकिनान्याजवळ सोनेश्वराचे एक देऊळ आहे. ते सुमारे चवथे शतकांत झाले असावे, तेव्हांपासून आठवे शतकापर्यंत शैव