पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळतात. सातशे इसति शुरनत्संग नांवाचा एक चीनदेशचा प्रवासी हिंदुस्थानांत आला होता. त्याणे त्या कालची हकीकत लिहून ठेवली आहे. तीत तो लिहितो:--खरा गुजराथदेश मटला ह्मणजे महीनदी. पर्यंतच. पुढे उत्तरोत्तर गुर्जर लोकांची वस्ती वाढत गेली, व ती वाढतां वाढतां माळव्यापैकी काही भाग, मारवाडपैकी काही भाग व सुराष्ट्रापैकी काही भाग मिळून हल्लीचा गुजराथदेश आहे. गुजराथेत प्रधम वल्ल. मीचे राज्य होते. ते मोडल्यावर अन्हिल पूर व पाटण येथे राजधानी झा. ली. ह्याप्रमाणे ह्याची सीमा वाढत जाऊन, हल्ली त्याचे हाला, भाल झालावाड, गोबीलवाड, चरोतर, काठेवाड, पाल, कानद, बाबरीपावड, उ. खामंडल, मच्छकांटा, चाल, कांकरेज, वगैरे भाग झाले आहेत. ह्या भागांत पवित्र क्षेत्रे व तीर्थे मानलेल्या नद्या पुष्कळ आहेत. ह्यांत द्वारका, प्रभास, गिरनार, सुदामपुरी, मोदपूर, मूळद्वारका, तुळशीशाम, गुप्तप्रयाग, ब्रह्मप्रयाग, विष्णुप्रयाग, रुद्रप्रयाग ही क्षेत्रे; व शत्रुजा, नर्मदा, साबरमती,सरस्वती ह्या नद्या मुख्य आहेत.द्वारकेचे माहात्म्य दुसरे शतकापासून वाढत गेले. पुढे दहाव्या शतकांत तेथें पुष्कळ यात्रा येऊन, तेथील राजास यात्रेसबंधी कराचे पुष्कळ उत्पन्न मिळाले. पूर्वी द्वारकेंत बौद्धलोकांचे प्राबल्य विशेष होते. चवथ्या शतकांत बुद्धधर्मीयांचे बल कमी होऊन,पुष्कळ हिंदुलोक तेथे विष्णची व शिवाची देवळे बांधू लागले.ह्याच वेळेस गुप्तवंशाचे राजाने, द्वारकेत त्रैलोक्य सुंदर व जगद्विख्यात जे रणछोडजीचे मंदिर आहे, ते बांधिले. पुढे मुसलमानांचे गर्दीत बोडाणा रजपूत याणे या मंदिरांतील मूर्ति पळवून ती डाकोरास आणून ठेविली. नंतर शंकराचार्य यांणी ईडराहून नवीन मूर्ति आणवून ती द्वारकेतोल सदई मंदिरांत बसविली; व एका मोठ्या विशाल शिलेवर श्रीयंत्र कोरून, ते स्थापन केले. हल्ली कित्येक लोक असे लणतात की, रणछोडजीचे मंदिर विश्वकाने बांधिलें आहे. पण, ह्या ह्मणण्यांत अर्थ नाही. गप्तवंशाचे राजे महावैष्णव (निःसीम विष्णुभक्त) होते. त्यांणी गिरनार येथेही एक विष्णुमंदिर बांधिले आहे, अशाविषयी जनागड येथे स्कंधगुप्त राजाच्या हातचा शिलालेख आहे,त्यांत उल्लेख आहे.ह्या शिलालेखावरून, द्वारकेतील रणछोडजीचे मंदिर गुप्तवंशाचे राजाने बांधले अशी जी आख्यायिका आहे, ती खरी असावी असे वाटते. व शिवाय, द्वारकेंतील