पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) काठेवाडप्रांताच्या पश्चिमेकडील शेवटास द्वारका ह्या नावाची दोन क्षेत्रे आहेत. एक गोतमी द्वारका, व दुसरे बेट द्वारका. ह्या भागाच्या टापस कुशावर्त, कुशद्वीप, आनत उखामंडल अशीही आण - खीं नांवे आहेत. यांपैकी आनत हे नांव पडण्याचे कारण असे सांगतात की, पूर्वी आनत नांवाचा राजा राज्य करीत होता; तेव्हां, तदंकित प्रदेशास आनत असे नांव मिळाले. यादवांसहित कृण्ण द्वारकेत राहेले ह्मणून तिला पूर्वी यदुपुरी असे मगत असत. प्रभासखंड व द्वारकामाहात्म्यांत, भद्रवती (भादर) नदीचे दाक्षिणेम समुद्रापर्यंत प्रभास क्षेत्र गणले असून, ते बारा योजने लांब आहे, असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे मोदपुराचे ( मोदपूर हे द्वारकेच्या पश्चिम बाजूस आहे.)पश्चिमेस बारा योजनें झणजे सुमारे५०कोस लांब जी भूमि आहे, तो द्वारका समजावी, असे झटले आहे.काठेवाडांत कोडिनार झणून एक जागा आहे, ती मूळची द्वारका, असे म्हणतात. काठेवाड व गजराथ हे दोन प्रांत हल्ली परस्परांस लागून आहेत, तरी त्यांमध्ये पूर्वी समुद्र होता अशाबद्दल खूण आहे, व तीस नळकंठा असें झणतात. द्वारका हे बेट पूर्वी ओसाड असून, तेथे कुशनामा एक वैश्य रहात होता ; व हे सर्व बेट कुश म्हणजे कासनांवाच्या गवताने व्याप्त होते ह्या दोन कारणांवरून द्वारकेस कुशद्वीप व कुशावर्त अशी नांवें पडली. मथरेहन यादव द्वारकेस आले तेव्हां हा भाग अरण्यमय होता, असे परा. णांत लिहिले आहे. गिरनारपर्वत द्वारकाक्षेत्राच्या बाहेर आहे, असेहणतात. या पर्वताजवळ रेवत (आनर्त राजाचा रेवत नांवाचा एक मुलगा होता, तो या पर्वतावर खेळावयास जात असे,यावरून त्या पर्वतास 'खेत' हे नाव पडले,अशी दंतकथा आहे.)व उज्जयंत असे दोन पर्वत आहेत. खेतपर्वताजवळ एक कुंड आहे, त्यास रेवतीकुंड असें ह्मणतात. याच्या कडेवर बलदेव व त्याची बायको खेती यांची देवळे आहेत. बलदेव यास दाउजी असेही नांव आहे. नर्मदेचे दक्षिणतीरी असलेल्या कोंकण प्रांतास लाटदेश असे नांव आहे. भारतांत, पांडवांतला कनिष्ठ जो सहदेव त्याने भोजलाटदेशचा राजा भीमकसेन यास जिंकिलें होते, असे लिहिले आहे. सुराष्ट्र देशांत काठेवाड, कच्छ व गुजराथ हे सर्व भाग धरले आहेत, अशी प्रमाणे