पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्बजानेका मल्लया संष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास - - - भागला. (देशाचें सामान्य वर्णन व जुनी माहिती.) ज्या प्रांतास हल्ली आपण काठेवाड ह्मणतो त्यास पूर्वी सुराष्ट्र असे नांव होते.कियेकांचे मणणे असे आहे की, ह्या प्रांतास सुराष्ट्र असे नांव नसून, सौराष्ट्र असे होते व त्या नांवाचे समर्थनार्थ ते असें ह्मणतात की, ह्या प्रांतांत सौर मणजे सूर्यभक्तांची वस्ती होती; तेव्हां, अर्थात त्यांचे जे राट्र तें सौराष्ट्र. प्रथमदर्शनी पाहतां एक प्रकारच्या व्यामोहाने ह्या लोकांचे वरील झणणे सयुक्तिक आहेसे वाटते. परंतु, थोडा विचार केला असतां तेव्हांच लक्षात येईल की, सौरांचे जे राष्ट्र ते सौरराष्ट्र व्हावें; सौराष्ट्र कसे? अर्थात जे लोक सौराष्ट्र हे नांव अन्वर्थक व सयुक्तिक आहे अतें ह्मणतात, त्यांचे ते मणणे निरर्थक व अयुक्तिक दिसते. अथवा, सौरराष्ट्र' असे ह्मणतांना दोन रेफांचे जागी एकाचाच उच्चार करणे सुलभ वाटल्यावरून 'सौराष्ट्र' असें नांव पडले असेल. पण, इतक्या कल्पना व ओढाताण करण्यापेक्षा "यास पूर्वी सुराष्ट्र असे नांव होते" ह्मणून जे आमों वर लिहिले आहे तेच बरे असे आमास वाटते; व त्याची यथार्थता,तो प्रांत सुपीक आहे,यावरून स्पष्ट होत आहे. आतां, सुराष्ट्र हेच नांव खरे मानले तर त्यांत राहणारे जे लोक त्यांस मात्र सौराष्ट्र असे ह्मणणे यथार्थ होईल अस्तु. बादशाही अमलांत या प्रांतास सोरट असे नाव पडले. त्यानंतर जेव्हां मराठ्यांच्या फौजा हिंदुस्थानांत प्रांत काबीज करीत करीत ह्या प्रांताजवळ आल्या, व त्यांनी तो हस्तगत केला, तेव्हां त्यांत कामे नावाचे लोक फार होते, त्यावरून ह्या प्रांतास काठेवाड असें नांव पडले न नांव अद्यापि चालू आहे.