पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय चौदावा




 १४.०१ रिस्टोटेलियन किंवा देकार्त यांच्या तर्कशास्त्राची रचना होय/नाही या स्पष्ट कप्प्यांत करण्यावर आधारलेली आहे.वस्तुस्थितीचे आहे/नाही,होय/नाही असे स्पष्ट कप्पे पाडून विचारांची किंवा विधानांची मांडणी केली जाते.त्यामुळे त्यांच्यातला भेद स्पष्ट होतो.साम्यभेद नेटकेपणाने समोर येतात. सर्व विचारांवर होय/नाहीच्या या साच्याची जबरदस्त छाप आहे.तार्किक बोलणे म्हणजे कप्प्यांत,वर्गीकरण करून बोलणे,विचार करणे,वागणे असे मानले जाते.त्याव्यतिरिक्त विचार करण्याची पद्धत असू शकते याला बुद्धिमंतांची मान्यता नाही.'येसानो' चा हा ठोकळा सगळ्या विचारांवर आहे.या विचारसरणीमुळे चिकित्सा,विश्लेषणाचे फायदेही आहेत.पाश्चात्य लोकांशी जित समाज म्हणून संपर्क आल्यावर भारतातल्या सर्व शिक्षित समाजावर या विचारसरणीची भुरळ पडलेली जाणवते.सर्व विद्या किंवा विचारप्रसार हा प्रामुख्याने इंग्लिशमधून झाल्यामुळे ही पायाभूत तर्कप्रणाली सर्व पुस्तकांतून,लेखनातून वा भाषणांतून गृहीत धरलेली असते.

 १४.०२ हा साचा माझ्याही डोक्यावर आहे हे मला माहीत नव्हते.एडवर्ड डि बोनो या लेखकाचे 'पो : बियाड येस ऑर नो' हाती येईपर्यंत मी ह्या साच्यात घट्ट अडकलेला होतो.ते पुस्तक वाचल्यावर मला या बौद्धिक बेडीची जाणीव झाली.ॲरिस्टोटेलियन तर्कशास्त्र एवढेच खरे नव्हे,तर लॅटरल

सुरवंटाचे फुलपाखरू ७९