पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थिंकिंगमुळे, ते प्रमुख तर्कशास्त्र असले तरी ते एकमेव तर्कशास्त्र नाही हे स्पष्ट झाले.या जोखडातून मुक्तता झाल्यावर मला भारतीय विचार जास्त स्पष्टपणे कळू लागला.बोनोच्या लॅटरल थिंकिंगमुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला.माझ्या मूळ भारतीय स्रोताकडे जाण्याला हा दणका खूप उपयुक्त ठरला.
 १४.०३ होय नाही ही मांडणी तर्कदृष्ट्या बरोबर आहे असे मानल्यावर पुढची पायरी म्हणजे तीच एकमेव तर्कपद्धत ही कल्पना बळावते.प्रत्येक घटना,गोष्ट विशिष्ट साच्यात बसली पाहिजे हा आग्रह सुरू होतो.हा जो एकमेवत्वाचा आग्रह आहे ती मोठी बेडी आहे.यातून माझंच' बरोबर हा विचार सहजपणे येते.हा 'च' फार महाग पडतो.जगातली सगळी भांडणे,युद्धे,हिंसा ही या 'च' च्या आग्रहातून उत्पन्न होतात.विनोबांनी त्यांच्या शैलीत याचे छान विवरण केले आहे.ते म्हणतात,हा 'ही' व 'भी' मधला फरक आहे.(हा संदर्भ अर्थात हिंदी भाषेतला आहे).माझाच विचार बरोबर किंवा योग्य असे न म्हणता माझाही विचार बरोबर किंवा योग्य आहे असे म्हटले तर वाद हे शाब्दिक पातळीवर राहतात.त्यांत कडवटपणा येत नाही.एकूण विचारसरणीत फरक पडतो.

 १४.०४ याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे धर्माच्या नावावर होणारे जगभरचे झगडे.सर्व धर्म पूजनीय आहेत.सारे पंथ,मार्ग एकाच ईश्वराकडे जातात अशी मांडणी आपल्याकडे केली जाते.सर्वधर्म समभाव असे त्याचे वर्णन आपल्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.सर्व धर्म ‘एकं सत्' मानतात हे बरोबर आहे.त्या 'एकम्' ला ईश्वर,ब्रह्म,येहोवा,गॉड,अल्ला असे नाव देतात,येथवर ठीक आहे.भारतीय वैशिष्ट्य 'बहु-धा वदन्ति' मध्ये आहे.म्हणजे ह्या एकाच सत् ला विविध नावांनी ओळखले जाते हे मान्य होणे कठीण आहे.हा बहुधा किंवा अनेकान्तवादी विचार सर्वाना मान्य होत नाही.म्हणजेच येहोवा,गॉड,अल्ला हे एकम् मान्य असते,पण आग्रह त्यापैकी एकच सत् बरोबर बाकीचे अन्य सत् त्या पांथिकांना मान्य नसतात.वेगवेगळ्या मार्गांनी एकाच ईश्वराकडे जाण्याचा पर्याय त्या धर्मश्रद्धाना मान्य नसतो.म्हणजेच हे सारे 'ही' वादी होतात.'भी' वादी होण्याचे त्यांना मान्य नसते.कुठल्याही पंथाला,पक्षाला,एकमेवत्वाच्या भिंती घातल्याशिवाय वेगळेपणा दाखवता येत नाही.आपल्या गोटातला कोण व बाहेरचा कोण हे ठरवणे,त्यांचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही.भिंतीच्या आतल्या माणसाला मिळणारे लाभ भिंतीबाहेरच्या माणसाला मिळू शकत नाहीत.त्यामुळे त्या त्या पंथाचे (धर्माचे) लोक 'बहु-

८० सुरवंटाचे फुलपाखरू