पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

औद्योगिक संबंधातले संबंध (Relations)वगळून फक्त औद्योगिक विवादांचा (Disputes) विचार केला आहे. हा फरक केवळ शब्दांतला नाही तर मूळ भूमिकेतला आहे.ज्यांनी याहून वेगळा विचार केला आहे त्या मालकांनी किंवा व्यवस्थापकांनी वेगळ्या वाटेने यश मिळवले आहे.कीर्तीचे वेगळे मानदंड स्थापित केले आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर जमशेटपूरच्या टाटांच्या कारखान्याच्या राष्ट्रीयीकरणाचा केंद्र सरकारने केलेला विचार १९७७ साली तिथल्या कामगारांच्या युनियनने हाणून पाडला.त्यांच्याकडे पन्नास वर्षांत काम बंद पडलेलेच नव्हते.

.

७८ सुरवंटाचे फुलपाखरू