पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३.०२ अशा या जाणकार व बुजूर्ग कामगार नेत्याबरोबर अनेक वेतनविषयक करार मी केलेले आहेत.त्यांची अंमलबजावणीही झालेली आहे.त्यांच्या या व्यवहारात त्यांचा शब्द हा अखेरचा असा दोन्ही बाजूंच्या लोकांनी मानावा असा त्यांचा आग्रह असे.ते म्हणतील ती पूर्वदिशा असे कामगारांनी व मालकांनीही मानावे असा त्यांचा आग्रह असे.कामगार हे मानायला तयार असत,कारण युनियन चालवण्याचे काम करायला कोणाला नको असते.युनियनमुळे मिळणारे फायदे मात्र सर्वांना हवे असतात व त्यासाठी जी काही क्षुल्लक वर्गणी द्यावी लागते ती एकाच काय पण अनेक युनियन्सना द्यायची त्यांची तयारी असते.कारण बहुतांश करार हे मालकांनी एकतर्फी पाळायचे असतात असे आपल्याकडचे वातावरण आहे.
 १३.०३ मालक लोकांना हे स्वीकारणे कठीण असते.अनेक कारखानदार औद्योगिक शांतता विकत घेण्याचा हा सोपा मार्ग समजतात.त्यांचा दृष्टिकोन युनियन ही औद्योगिक शांतता पुरवणारी एजन्सी असा असतो.एका मेहतांशी जमवून घेतले की मग पन्नास कामगारांशी बोलण्याची गरज उरत नाही.त्या दृष्टीने हा प्रश्न सोपा असतो.खरा प्रश्न मोठ्या कारखान्यांत येतो.तिथे मालक.ही बहुधा कंपनी असते. मालक ही संकल्पना धूसर असते.व्यवस्थापक ही एक नवीन व्यक्ती मध्ये येते. ह्या व्यवस्थापकांसाठी कंपनीचे मालक व आरजेंसारखा औद्योगिक शांतता पुरवणारा पुरवठादार यांच्या खिंडीत अडकल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.व्यवस्थापकाच्या दृष्टीने दोन साहेब तयार होतात.तो मध्ये गरला जातो. या संघर्षात खासगी क्षेत्रातली शाश्वती नसलेली नोकरी असा त्याचा अनुभव असतो.

 १३.०४ आरजेंच्या युनियनने 'युनिकेम'च्या जोगेश्वरी कारखान्यात जवळजवळ सहा महिने मंदकाम आंदोलन चालवले होते.संपाचा हा चेंगट प्रकार कायद्याच्या मार्गाने जाणाऱ्या मालकांना गुदमरवणारा असतो.पगार तर पूर्ण द्यायचा पण काम किती निघेल ते सांगता येत नाही अशी स्थिती असते.तशीच ती 'युनिकेम'मध्ये होती.जून १९७९ ते ३ डिसेंबर १९७९ एवढा काळात हे आंदोलन चालले.उत्पादन नित्याच्या मानाने जेमतेम चाळीस टक्के मिळत असे, पण कायद्याची अपेक्षा पूर्ण पगार द्यावा व कामगारांवर वैयक्तिक शिस्तभंगाची कारवाई करावी अशी होती.माझी आवश्यक ती कोर्टातली धावाधाव चालू होती.मी जुलै १९६७ पासून 'युनिकेम' बुलेटिन म्हणून मासिक चालवत होतो.त्यातून कामगारांच्या कानावर युनियनशी होणाऱ्या चर्चा महिन्याच्या महिन्याला लिहून घालत होतो. ही पत्रिका कामगारांच्या घराघरात

सुरवंटाचे फुलपाखरू ७१