पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय तेरावा





 १३.०१ मी स्वतः सामाजिक संस्कारांचे एक जिवंत उदाहरण अनुभवले आहे.मी 'युनिकेम'मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असताना, १९७४ पासून १९७९ पर्यंत कंपनीच्या जोगेश्वरीतल्या कारखान्यातल्या कामगारांच्या युनियनची सूत्रे आर.जे.मेहता यांच्या मुंबई मजदूर सभेकडे होती.ती मान्यताप्राप्त युनियन होती.आर.जे.मेहता हे मुंबईच्या ट्रेड युनियन क्षेत्रातले मोठे,जबरदस्त आणि आक्रमक नेते होते.त्यांची मला जाणवलेली जी अनेक वैशिष्ट्ये होती त्यात माझ्या झटकन लक्षात आलेले वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची आर्थिक व्यवहार समजण्याची क्षमता व दक्षता.ते पालनपरी जैन या.हिरेव्यवसायात पहिल्यापासन पुढे असणाऱ्या समाजातले व व्यापारी परंपरेतले गृहस्थ होते.त्यामुळे अर्थव्यवहाराची त्यांची जाण पक्की होती.कामगारांनी भरपूर काम करावे व भरपूर पैसे मिळवावेत हा त्यांचा दृष्टिकोन असे. अनेक कारखानदारांचा अनुभव असा होता,की त्यांनी जे जे करार केले त्यांची कामगारांच्या बाजूने अंमलबजावणी करवून घेण्याची त्यांची क्षमता होती.कामगारांना संपात उतरवायचे आणि संपाचा डाव दीर्घ काळ कुजत पडला की काय करायचे याची माहिती नसायची असा प्रकार त्यांच्या बाबतीत नसे. कारण कोणता कारखाना काय देऊ शकेल ह्या बाबतचा त्यांचा ठोकताळा असायचा.तो सहसा चुकत नसे.त्यांना कामगार कायद्यांतल्या खाचाखोचा ठाऊक होत्या.

७० सुरवंटाचे फुलपाखरू