पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या व्यवस्थापक म्हणून घेतलेल्या निर्णयांबद्दल ऐकलेले आहेत.कदाचित ते खरेही असतील.मला मात्र ते त्या त्या वेळी तसे वाटले नव्हते.तसा माझा कुठलाच मुद्दा मी सोडत नाही,पकडून ठेवतो असे माझ्याशी ज्यांनी करार केले आहेत त्यांचे मत असे.त्यांना मी फार घासाघीस करणारा वाटत असे.पण माझेच बरोबर असा ठाम व अटळ विश्वास माझ्या मनात नसतो.
 १२.१९ वास्तव हे वास्तव असते. त्याच्यावर तर्कात, चौकटीत बसण्याची जबाबदारी नसते.ते असते.माझ्या ज्ञानाला,वर्णनाला,मानसिक चौकटींना,नकाशांना भूमितीची,आकारांची,तार्किक व्यवस्थेत बसण्याची आवश्यकता असते,वास्तवाला ती तशी नसते.म्हणूनच जे शक्य नाही असे वाटते ते

घडलेले असते,हे अनेक आत्मचरित्रांतला मजकूर वाचल्यावर माझ्या ध्यानात आलेले आहे.कादंबऱ्यांत ते खरे वाटले नसते,काल्पनिक व खोटे समजले गेले असते,पण प्रत्यक्षात तसे घडलेले असते.माझ्या गुरूंचा 'आत्मचरित्र'च वाच हा वाचनासंबंधीचा उपदेश मला असा उपयोगी पडलेला आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू ६९