पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेटेंट रद्द करून मागितले होते.त्या लोकांनी मुंबईत उपलब्ध असलेल्या नामवंत वकिलांना त्यांच्यातर्फे अधिकारपत्र देऊन अडकावून ठेवले होते.आधीच या कायद्यावरचे खटले दुर्मीळ त्यामुळे यात खास तयारी असणारे वकील मुळात कमी व जे होते त्यांना ह्येक्स्टने आपल्याकडे घेऊन आमची कोंडी केली होती. आमच्या वतीने मझबान मिस्त्री ह्या नावाचे नामवंत वकील उभे राहिले.त्यांच्या मदतीला एस पी भरुचा हे तरुण वकील उभे होते.ते २००२ मध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.त्याशिवाय एस बी शाह हे माझे प्राध्यापक व या कायद्याचे खास अभ्यासक 'युनिकेम'च्या वतीने उभे राहिले होते.आमच्या केसचा भर आमचे पेटेंट कायद्याने प्रस्थापित केलेल्या मार्गाने मिळवलेले आहे,म्हणजेच सरकारच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आमच्या पद्धतीचा वेगळेपणा मान्य केलेला आहे.उत्पादन एक असले तरी उत्पादनाची पद्धत वेगळी असल्याने आम्ही एकाच अंतिम उत्पादनावर दोन वेगवेगळ्या मार्गांनी येऊन पोचलेले आहोत असा आमचा दावा होता.
 १२.१३ कालानुक्रमाने,पहिले पंजीयन ह्येक्स्टचे होते.तो वादाचा मुद्दा नव्हताच.पण ते पंजीयन सरकारी दप्तरात असूनही आम्हाला पेटेंट मिळालेले होते व महाराष्ट्र सरकारचे पेटेंटही पंजीकृत होते हे टेक्स्टला मान्य होते.आमच्या दृष्टीने हाच कळीचा मुद्दा होता.त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा एकच व तांत्रिक स्वरूपाचा असा होता,की आमची पद्धत (प्रोसेस) खरोखरी वेगळी होती का? हाफकिन इन्स्टिट्यूटचे संबंधित शास्त्रज्ञ आम्हाला ठामपणे सांगत होते,की त्यांची प्रोसेस वेगळी आहे.ह्येक्स्टने ब्लँको वाइट या ख्यातनाम व या विषयात खास तज्ज्ञ असणाऱ्या इंग्लिश बॅरिस्टरना त्यांची बाजू मांडायला आणले होते. त्यांचे अनेक भारतीय वकील व आमचेही वकील विज्ञानाची व खासकरून रसायनशास्त्रातली पार्श्वभूमी असणारे नव्हते.आमची सारी भिस्त आमच्या रसायनशास्त्रातल्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांवर होती.थोडक्यात म्हणजे एका बाजूला रसायनशास्त्रातला जाणकार व पेटेंट कायद्यातला तज्ज्ञ वकील व दुसऱ्या बाजूला त्या शास्त्रातले खास तज्ज्ञ यांच्यात प्रोसेसच्या वेगळेपणाच्या दाव्यावर लढाई होती.न्यायाधीश रसायनशास्त्रातले जाणकार असण्याची अपेक्षा नसते व तसे ते नव्हतेही.

 १२.१४ माझे रसायनशास्त्रातले ज्ञान जवळजवळ शून्य होते.पण या केससाठी तयारी करताना कार्बन अॅटम्स, बेंझिन रिंग,वॅलेन्सीज व त्यांची जोडणी हे सारे शिकावे लागले.हे शिक्षण जुजबी होते. आमची व आमच्या वकिलांची अडचण होती ती वेगळीच.आमचे शास्त्रज्ञ जोरजोराने वाद करायचे

६६ सुरवंटाचे फुलपाखरू