पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे असे लोकांना वाटते. भारतातले अद्वितीय विचारवंत आचार्य विनोबा भावे यांनी त्याचा उद्घोष १ नोव्हेंबर १९५७ रोजी 'आता 'जय हिंद' पुरेसे नाही, तर 'जय जगत' हवे,' असा केला होता. ही घटना लोकांना माहीतच नाही असे आढळले.
 त्यामुळे माझे अनुभव, त्यांचे भारतीय मुळाशी नाते व जग छोटे होत असताना भारतीय विचारपद्धतीत असलेली अंतर्गत ऊर्जा जगव्यापी कशी होऊ शकेल असा विचार मनात आल्यावर, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा असे प्रकर्षाने जाणवले. या नव्या जगात वावरण्यासाठी, संगणक व इंटरनेटमुळे घरात येणारी क्रांती कशी पचवायची, त्यांचा वापर करून भारतीय पृथगात्मता व तिची जयष्णुता पुढे कशी आणावी हा विचार बळावला. अर्थात मी हे सारे माझ्या अनुभवांच्या मर्यादित चौकटीतून, व्यवस्थापनशास्त्राच्या मर्यादित क्षेत्रातल्या शक्यतांतून मांडले आहे.
 व्यवस्थापनशास्त्र हे जागतिक आहे. त्यात भारतीय असा वेगळेपणा आहे का? हा प्रश्न माझ्यासमोर गेली अनेक वर्षे सतत आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. रसायन. वैद्यक भौतिकी ही जशी जागतिक विज्ञाने किंवा शास्त्रे आहेत; तसेच अर्थशास्त्राचे आहे. हिंदू अर्थशास्त्र असे वेगळे काही शास्त्र आहे हे मला पटत नाही. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्राचे तसेच आहे का? त्याबाबतचा हा माझा शोध आहे.
 मी स्वतः व्यवस्थापक म्हणून १९६४ सालापासून २००७ सालापर्यंत निरनिराळ्या पदांवर काम केले आहे. व्यवस्थापनशास्त्रावरची पाश्चात्य लेखकांची बरीच पुस्तके आहेत, त्यांतली काही मी वाचली आहेत आणि त्या पुस्तकांत दिलेल्या काही कल्पना व विचार प्रत्यक्ष माझ्या कामाच्या ठिकाणी वापरून पाहिल्या आहेत.मी काम करत असलेल्या कंपन्यांच्या कामगारांना उद्देशून १९६६ पासून २००७ पर्यंत दरमहा पत्ररूपाने, त्या कल्पनांच्या अनुषंगाने काहीना काही लिहीत आलो आहे.
 त्यातले जे विचार पक्के झाले त्यांना एकत्रित स्वरूपात वाचकांच्यासमोर मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
 मी रोज नवे विचार वाचत नव्याने जगत असतो व रोजच, माझ्या स्वतःच्यात प्रयत्नपूर्वक बदल करत असतो. मी रोज बदलतो म्हणून माझे लेखनही आपोआप बदलत गेलेले आहे.
 व्यवस्थापनशास्त्रातल्या अनेक परकीय संकल्पना, विचार इंग्लिश भाषेमधून

भारतात येतात, त्यावर परिसंवादही होतात, पण त्या संकल्पनांचा वापर करून

आठ