पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राथमिक बनून त्यावर चिकित्सेची व सिद्धांतांची उभारणी झाली आहे.
 १०.१२ माणूस मुळात आनंदरूप आहे.त्याच्या आत्म्यावरची बाह्य आवरणे,देहभाव,जडकोष ही पांघरुणे आहेत.ती प्रयत्नांनी दूर केली, बाजूला सारली तर माणूस आनंदरूपदर्शन अनुभवू शकतो. पाश्चात्य विचारात माणूस त्याच्या मूळ पापामुळे (ओरिजिनल सिन) पृथ्वीवर फेकला गेलेला आहे.त्याचे मूळ पापात आहे अशी कल्पना आहे.ह्या संपूर्णपणे भिन्न व विरुद्ध अशा संकल्पना आहेत.
 १०.१३ त्यांच्याकडच्या मोरॅलिटीच्या, सामाजिक मूल्यांच्या किंवा रिलिजनच्या प्रचलित कल्पना त्यांच्या इहवादात अडथळ्याच्या ठरतात.म्हणून त्यांचा स्पष्ट उल्लेख व्यवस्थापनशास्त्रातल्या त्यांच्या पुस्तकात नसतो,पण तेथील विचारक त्यामागची मूल्यव्यवस्था गृहीत धरत असतात.भारतीय मूल्यविचार धर्म या कल्पनेत वसलेला आहे.तो वगळून व्यवस्थापनाचा विचार करता येणार नाही.धर्म या शब्दात भारतीय संदर्भात खूप मोठी शक्ती आहे.तिचा योग्य वापर भारतीय व्यवस्थापनव्यवहारात करून घेता येण्यासारखा आहे.

 १०.१४ नारदीय कीर्तनातील पूर्वरंग इथे संपला.पुढचे अध्याय हे उत्तररंगाचे आहेत.

सुरवंटाचे फुलपाखरू ५३