पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय दहावा




 १०.०१ व्यवस्थापकांनी महाजन बनण्याचे ध्येय समोर ठेवले तर व्यवस्थापनाचे प्रश्न सोपे होतात. विनोबांनी समाजाच्या घटनेसाठी पंच-जन-शक्तीचे महत्त्व सांगितले आहे.त्यांनी समाजातल्या या पाच प्रकारच्या लोकांची गणना अशी केली आहे.

 "आपल्या हाताची बोटे पाच असतात.तशा समाजातल्या या पाच शक्ती आहेत.पहिली शक्ती ही अंगठ्यासारखी.अंगठा हे सर्वात मजबूत बोट असते.त्याला मी जन-शक्ती म्हणतो.सत्य व अहिंसा यांच्या पायावर या जनशक्तीला मी उभी करू इच्छितो.दुसरी आहे मनाची प्रेरणा देणारी शक्ती.तिला मी करंगळीची उपमा देऊ इच्छितो.ती असते सज्जन लोकांची शक्ती.साध्या भाषेत त्याला सेवकांची किंवा सज्जनांची शक्ती म्हण.नैतिक धर्मनियमांच्या आधारावर जीवन घालवणाऱ्यांची शक्ती,सतत कार्यरत राहणाऱ्यांची शक्ती.तिसरी दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या बोटाच्या जागी मी विद्वान लोकाच्या विद्वज्जनशक्तीची कल्पना करतो.जगात चांगले काय-वाईट काय याचा अभ्यास करून,तटस्थ वृत्तीने विचार करून लोकांसमोर आपले विचार मांडणाऱ्या या लोकांचे कार्य या निर्देशक बोटासारखे असते.मधले मोठे बोट असते ते महाजन शक्तीचे रूप होय.समाजातले धनिक,उद्योजक,व्यापारी,व्यवस्थापक हे या महाजनशक्तीचे रूप होय.इतर साऱ्या

सुरवंटाचे फुलपाखरू ४९