पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी ते सोपे नसते.आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांची संख्या,जगातल्या वेगवेगळ्या भूभागातल्या लोकांशी येणारा संपर्क,निरनिराळ्या भौतिक गोष्टींची वाढत जाणारी संख्या,त्यांची गुंतागुंत ही अक्षरशः भोवंड आणणारी असतात.विज्ञानामुळे भौतिक गोष्टींची वाढ आणि त्यासाठी वाटणारी लालसा सारखी वाढत असते.
 ८.०४ महाभारतातली ययातीची कथा प्रसिद्ध आहे.ययाती या राजाने त्याचे आयुष्य नाना प्रकारचे उपभोग घेण्यात खर्च केले.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणारे वार्धक्य त्याच्याही वाट्याला आले,पण त्याची उपभोगाची लालसा पुरी होत नव्हती.त्याने आपल्या मुलाजवळ त्याचे तारुण्य मागून घेतले व मुलाला आपले वार्धक्य दिले,तरीही त्याची उपभोगाची लालसा परी होईनाः उपभोग भोगन समाधान होईना तेव्हा मग त्याला वैराग्याचा झटका आला आणि सबंध आयुष्याच्या विफलतेचा अनुभव मिळाला. महाभारतकारांनी त्याच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी श्लोक लिहिला आहे.
 न जात कामः कामानां उपभोगेन शाम्यति ।
 हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ।।
उपभोग, आणखी उपभोग यांतून फक्त चंगळवाद फोफावतो,अधिकाधिक अभिलाषा निर्माण होते.पण कामना काही शमत नाहीत.त्या सारख्या वाढत राहतात.ज्याप्रमाणे यज्ञात दिलेल्या हविर्भागामुळे यज्ञीय अग्नी भडकत राहतो,तशी उपभोगातून तृप्ती येत नाही.उलट लालसा वाढत राहते.हा सार्वत्रिक अनुभव आहे.ज्याला खाण्याची आरोग्यदृष्टया कमीत कमी गरज असते त्यालाच खाण्याच्या पदार्थांचे आकर्षण जास्त असते.त्याच्या जिभेचे लौल्य सदैव धारदार राहते.

 ८.०५ माणूस सदैव बाहेरच्या जगाचा,बाहेरच्या गोष्टींचा विचार करतो.त्यांतच रंगून जातो, त्यांतच गुरफटून राहतो.आधुनिक जगात बाह्य उपाधींचे आकर्षण एवढे जबरदस्त वाढले आहे,की मग स्वतःबद्दल विचार करायला वेळ राहत नाही.ही सारी बाह्य व्यवधाने माणसाच्या मनाला इकडेतिकडे खेचत राहतात.माणसाच्या विचारांचा मूळ गाभा असतो तो तोडण्याचा,त्याची शकले करण्याचा.तो प्रयत्न या बाह्य व्यवधानांमुळे चालू राहतो.जीवनाचा अर्थ लावण्यासाठी त्याचा स्वतःचा जो कॉम्प्युटर प्रोग्रॅम असतो तोच भ्रष्ट होऊन जातो.मग जीवनाचा अर्थ लागत नाही.जीवन निरर्थक, निःसंदर्भ बनते.कृती घडत राहतात.त्यांचा मेळ घालता येत नाही.अमुकएक गोष्ट व्यक्ती का करते,तिने ती का केली याचा बोधच होत नाही.पुढे पुढे तर साऱ्या कृती

४२ सुरवंटाचे फुलपाखरू