पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय आठवा




 ८.०१ चांगला व्यवस्थापक बनण्यासाठी व्यक्तीने काय करायला हवे.व्यक्तीने काम का करावे,या प्रश्नाचा शोध मला भारतीय मूल्यव्यवस्थेकडे घेऊन गेला.त्या शोधाचे फलित म्हणून मी जिथे काम करतो तिथली माणसे मला जास्त चांगली समजली.मला मिळणारे सहकार्य वाढले.माझ्या मनावरचा ताण कमी झाला. असल्या भावात्मक प्रेरणेशिवाय घडणारी कृती फक्त यांत्रिक होते.ते कलेवर होते.त्यांत प्रेरणेचा प्राण असत नाही.
 ८.०२ विषाद अर्जुनालाच होतो असे नाही.प्रत्येक व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनात तो होत असतो.श्रमाने असो,भावनात्मक असो,खोल विचार करून असो,निराशेने असो,धक्क्याने असो.विषाद हा कधी ना कधी निर्माण होतच असतो.अर्जुनासमोरचा प्रश्न 'मी युद्ध कशासाठी लढू' हा होता. व्यक्तीसमोर मी काम का करावे? कशासाठी करावे?असा प्रश्न असू शकतो.भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला गीतेतला कर्मयोग सर्व लोकांच्या उपयोगाचा आहे. खास करून ज्यांना लोकांकडून काम करवून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा आहे.

 ८.०३ माणूस जे जीवन जगतो ते सातत्याने बाह्यदर्शी असते. चिंता,जीवनाचा वेग, गुंतागुंतीचे प्रश्न हे इतके व्यामिश्र असतात की त्या गुंताड्यात आणि महाप्रचंड वेगात मूळ धागे तपासायला अंतर्मनात प्रवेश करायचा म्हटला

सुरवंटाचे फुलपाखरू ४१