पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७.१४ माझ्या या लिखाणाला गीता,जी प्रत्यक्ष कटोकटीच्या धर्मयुद्धात सांगितली व जिचे फलित निष्काम कर्मयोगात झाले,ती प्रेरणा आहे.तिच्यावरचे लोकमान्य टिळक व विनोबा भावे यांचे भाष्य हा आधार आहे.भारतीय विचारधारेत आद्य शंकराचार्य,ज्ञानेश्वर,टिळक,विनोबा आणि अन्य भाष्यकारांनी गीतेचा अनेक अंगांनी अर्थ लावला आहे.ती ती त्यांची दर्शने आहेत.व्यवस्थापकाच्या आयुष्यातल्या लढाया,युद्धे ही स्व-जनांशी असतात,म्हणून तर गीतेचा संदर्भ योग्य असा ठरतो.

४० सुरवंटाचे फुलपाखरू