पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा धन यांचे सत्ताकारणातले महत्त्व कमी होते.व्यक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीच्या आंतरिक प्रगल्भतेवर अवलंबून ठेवल्यामुळे त्याच्या जवळचे धन किंवा त्याचे सेक्सअपील हे महत्त्वाचे ठरत नाही.अकिंचन अवस्थेतल्या साधूंनी, चिंतकांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे,ते वैयक्तिक विकासाच्या पातळीवर किंवा वैयक्तिक प्रगल्भतेवर.
 ७.०३ मार्क्ससुद्धा माणूस किंवा व्यक्ती हाच विकासाचा मानदंड मानतो.त्याची मूळ प्रेरणा नैतिक भूमिकेवर आधारलेली आहे.'मी'ने चांगले का वागावे? हा सनातन प्रश्न त्यालाही पडलेला होता. त्याने स्वतःला जडवादी मानताना,शुद्ध वैज्ञानिकतेचा पुरस्कार करत असताना,ईश्वरासमोर सर्व समान आहेत ही अध्याहृत धर्मकल्पना आर्थिक क्षेत्रातही सर्व समान असायला हवेत अशी विस्तारली.सर्व माणसे वेगवेगळी दिसतात हे नैसर्गिक वास्तव आहे.शक्ती, बुद्धी, उंची, जाडी, वर्ण, क्षमता, कौशल्य यांबाबतीत सर्वामध्ये कोणतीही समानता प्रत्यक्ष दिसत नसताना साऱ्यांना समान का मानायचे याचे 'सायंटिफिक' उत्तर नाही. कारण मानवी समानता हे नैतिक मूल्य आहे. नैसर्गिक सत्य नव्हे. पाश्चात्यांच्या समानतेच्या मूल्यामागे सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत या धर्मकल्पनेचा आधार आहे.भारतीय समानतेच्या कल्पनेत केवळ माणसे नव्हे तर सारी सजीव सृष्टी ही एकाच परमात्म्याच्या अंशाची धनी आहे व म्हणून समान आहे असा आध्यात्मिक आधार आहे.पशुपक्षी, वृक्षवल्लरी हेही त्याच परमात्म्याचे अंश आहेत हे सूत्रदेखील पर्यावरण संरक्षणाच्या आधुनिक विचाराला आधार परवते.सर्वांभती समत्व हे नैतिक मूल्य आहे.
 ७.०४ विनोबा त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणतात, की भारतीय विचारात सर्व सजीवांत एकाच आत्म्याचा आविष्कार आहे हे मानल्यामुळे अहिंसा हे मूल्य स्थापित झाले आहे.सुरुवातीला माणूस माणसाला खात असे.आता तो तसे करत नाही.तो दुसऱ्या किंवा परकी माणसांना मारून का खात नाही,तर सर्व माणसे हे त्याचे सहोदर आहेत,त्याच्या समान आहेत म्हणून.तेच तर्कशास्त्र प्रगत झाले की प्राणिहत्या, मांसाहार ह्या कृती अनैतिक ठरतात.
 ७.०५ माणसे एका देवासमोर समान मानली की मग समान लोकांच्या समाजातले व्यवस्थापन हुकुमांवर, कायद्यांवर, हक्कांवर, धर्माज्ञेवर आधारलेले ठेवायचे की स्वतःच्या कर्तव्यप्रेरणेवर सोडायचे हा प्रश्न पुढे येतो.या प्रश्नावरची पाश्चात्य व भारतीय उत्तरे दोन टोकांची भासणारी आहेत.

 ७.०६ पाश्चात्य विचारात हक्क व अधिकार हा माणसामाणसांमधल्या परस्परसंबंधांचा पाया मानला जातो.भारतीय विचारात कर्तव्य हा परस्परसंबंधाचा

सुरवंटाचे फुलपाखरू ३७