७.०१ व्यवस्थापनाच्या विचारात हक्काकर्तव्ये यांचा प्रश्न साहजिक उपस्थित होतो.दोनपेक्षा अधिक माणसे एकत्र आली की त्यांच्या परस्पर संबंधात हक्क-कर्तव्याचे मुद्दे येतात.व्यक्तीव्यक्तीमधल्या या नात्यांना,या साऱ्या अणंना जोडणारी ऊर्जा कोणती हा प्रश्न निर्माण होतो.मानवजातीसमोरच्या या नित्य प्रश्नांची उत्तरे निरनिराळ्या तत्त्ववेत्त्यांनी त्यांच्या 'दर्शनां प्रमाणे निरनिराळी दिली आहेत.बर्दीड रसेलच्या मते, पदार्थविज्ञानात जे महत्त्व ऊर्जेला आहे तेच महत्त्व मानवी संबंधात 'सत्ता' या संकल्पनेला
आहे.ऐतिहासिक काळात निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळ्या लोकांनी ही सत्ता धर्माच्या नावावर, संपत्तीच्या,संघटनेच्या,लैंगिक आकर्षणाच्या जोरावर आपल्या हाती राखण्याचा प्रयत्न केला आहे.त्या त्या गोष्टींना समाजातले महत्त्वाचे मूल्य मानले आहे.फ्रॉइड हे मानवी संबंध व तदनुसार सामाजिक व्यवहार सेक्सच्या परिभाषेत समजावून देतो,मार्क्स तो धनाच्या परिभाषेत मांडतो,पण बर्नांड रसेलच्या मते साऱ्याच्या मुळाशी खरा मुद्दा सत्ता (पॉवर) हा आहे.रसेलच्या ह्या 'दर्शना'ने बऱ्याच समजायला वरवर कठीण वाटणाऱ्या सामाजिक घटना, समजायला सोप्या होतात. अर्थात हा विचार समूहाकडून व्यक्तीकडे जाण्याच्या पद्धतीतलाच आहे.
७.०२ याउलट,भारतीय विचार व्यक्तीकडून समूहाकडे जातो.त्यात व्यक्तीची सत्तालालसा, व्यक्तीच्या शरीराची सत्ता अशी न मानल्यामुळे सेक्स