पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेताना, एकाने आपण किती जण आहोत हे पाहण्यासाठी किती सवंगडी आहोत हे मोजायला सुरुवात केली. मोजल्यावर त्याने ओरडून सर्वांना थांबवले व म्हणाला,'अरे थांबा, थांबा.काही तरी घोटाळा आहे.आपण निघताना दहाजण होतो.पण आता मी मोजले तर ते नऊच निघाले.आपल्यापैकी कुणीतरी एक हरवला आहे'. चिंतातुर होऊन दुसऱ्याने मोजायला सुरुवात केली आणि त्याचेही उत्तर तेच निघाले. 'नऊ' पाळीपाळीने प्रत्येकाने मोजले.साऱ्यांचे उत्तर एकच. नऊ! तेव्हा दहा जणांनी एकमताने आपण 'नऊ' आहोत असा निष्कर्ष काढला.सारेजण चिंतेत पडले.हरवलेल्या दहाव्याचा शोध घेणे अपरिहार्य झाले.थोडा वेळाने एकाच्या डोक्यात प्रकाश पडला.तो म्हणाला,'आपण वेड्याप्रमाणे स्वतःला सोडून आपली संख्या मोजत आहोत.नऊजणच आहेत आणि एक हरवला म्हणून चिंता करत आहोत. स्वतःपासून मोजायला सुरुवात करा, पुरे दहाच्या दहा सापडतील!
 ६.१२ सामाजिक कामे करताना हेच घडते.मी सोडून सर्वांनी वेळ पाळायला हवी, वेळेवर यायला हवे.मला मात्र सवलत हवी.बाकीच्यांनी वादविवाद टाळावा.बाकीच्यांनी वाहने हाकताना शिस्त पाळायला हवी.त्यांनी त्यांची कामे मनापासून, मन लावून करायला हवी.त्यांनी साऱ्या चांगल्या गोष्टींचे पालन करायला हवे.समाजाने सुधारायला हवे.सरकार सुधारायला हवे.युनियन सुधारायला हवी. सोसायटी सुधारायला हवी.कुटुंब सुधारायला हवे.आपल्या सर्वांना हे शंभर टक्के मान्य असते.
 ६.१५ पण मी काय करणार? मी कसा सुधारणार हा प्रश्न आम्हाला पडत नाही.महत्त्वाचा वाटत नाही.आपण मी सोडून जग सुधारू पाहतो.जग बदलत नाहीच पण मीही बदलत नाही.ज्यांनी ज्यांनी स्वतःला बदलून पाहिले,त्यांनी त्यांनी त्यांना स्वतःला तर सुधारले, बदलले, पण त्यांनी त्यांचा समाजही सुधारला.मी पासून सुरुवात केल्याशिवाय आम्ही पर्यंत पोचणे शक्य नाही.मी हे स्वतःला जाणवणारे, बदलता येणारे वास्तव आहे.तो धागा पकडला तर पुढे पोचता येईल.

 ६.१६ भारतीय विचारात माझे कर्तव्य काय यावर भर आहे.माझे हक्क काय याचा विचार नाही.माझ्या कर्तव्यात इतरांचे हक्करक्षण होते.व्यवस्थापकांनी ही खूण लक्षात ठेवायला हवी.

सुरवंटाचे फुलपाखरू ३५