पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय सहावा
 ६.०१ नेत्याचे विचारांचे किंवा कल्पनेचे विश्व जेवढे व्यापक व प्रशस्त तेवढी अनुयायांची विकासाची वेस मोठी होते. कुठल्याही नेत्याने, व्यवस्थापकाने जो आत्मशोध घ्यायचा असतो किंवा घ्यायला हवा तो यासाठी. लोकांसमोर व्यापक ध्येय ठेवण्यात नेत्याची कसोटी असते. तुम्हाला रोजीरोटी देऊ असे सांगणारे लोकांना फक्त पशूच्या पातळीवर समजतात. रोजीरोटी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. तेवढीच आवश्यक असते पण पुरेशी ठरत नाही. ती प्राथमिक गरज खरी पण पर्याप्त नव्हे. रोटीची सोय करणे, मजुरी देणे, एवढीच जर मालकाची जबाबदारी मानली तर साऱ्या मालक-मजूर संबंधांची चर्चा भाकरी साधी की तूप लावलेली, करपलेली की नीट फुगवलेली, तुला किती व मला किती या परिघाबाहेर जाऊ शकत नाही. मग भाकरीसाठी हिसकाहिसकी, दिले म्हणजे लुटले या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याची परिणती म्हणजे गाजर किंवा चाबूक हेच पर्याय सर्वोच्च तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात पुढे येतात.

 ६.०२ उद्योगाचा, कारखान्याचा, कंपनीचा, संस्थेचा मूळ उद्देश, कामगार किंवा भागधारक यांच्या भाकरीपलीकडे व्यापक असायला हवा तसे नसेल तर. ज्याच्या आधारावर सान्या धंद्याचा डोलारा उभा तो ग्राहक अडगळीत पडतो. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कारखाने, बँका, कंपन्या नोकरांसाठी चालू लागतात. असे चालू राहिले तर धंदा चालत नाही, वाढत नाही, आणि

सुरवंटाचे फुलपाखरू ३१