पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागू होत असतात. धंदा मेला तर नोकरी मरते हे साधे गणित लक्षात न घेतल्याचे परिणाम उदाहरणार्थ मुंबईच्या कापड गिरण्या) सर्वत्र दिसतातच. लोकांना काम नको असते पण नोकऱ्या हव्या असतात. पण कामामुळेच त्यांची सामाजिक किंमत ठरत असते हे कुणी त्यांना शिकवत नाही. त्यामुळे 'मी समाजावर अवलंबून आहे, समाजाचे माझ्याशिवाय काही अडणार नाही' एवढा सोपा विचारही, स्वतःच्या पलीकडे विचार करू न शकणारा माणूस करू शकत नाही. आपल्या बऱ्याच व्व स्थापनातल्या प्रश्नांची मूळ गाठ तिथे आहे.

३० सुरवंटाचे फुलपाखरू