पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्ट वाईट मानली जात नाही. त्याला कायद्यात गैरवर्तन किंवा Misconduct असे लिहिलेले असते. पण चांगले आचरण किंवा वर्तन म्हणजे काय हे कुणाच्या गावीच नसते. कामगारसंघटना तो त्यांच्या कर्तव्याचा भाग मानत नाहीत. व्यवस्थापकही तो त्यांच्या जबाबदारीचा भाग मानत नाहीत.
 ४.१९ काम करणारा काय काम करतो- अगदी फायलिंग, टायपिंग, जोडणी. त्याची परिणती कशात होते, चांगले काम म्हणजे काय ही कल्पना सुद्धा व्यवस्थापकाने द्यायला हवी, काम करणाऱ्याने समजून घेऊन ती वाढवायला हवी, तरच कार्यपध्दीत प्रगती होऊ शकते. बारीकसारीक वाटणाऱ्या या गोष्टी खूप मोठे घोटाळे, चुका टाळू शकतात, गुन्हे उघडकीस आणू शकतात. साध्या वाटणाऱ्या या गोष्टींकडे दुर्लक्ष मोठा विनाश घडवू शकते.

 ४.२० व्यष्टी-समष्टी-सृष्टी व परमेष्टी या साखळीतल्या व्यष्टी आणि परमेष्टी या दोन पायांच्या पातळीवरचा वागणुकीचा किंवा वर्तनाचा विचार व प्रसार केला जातो. धर्माचार्य समष्टी म्हणजे समाज व सृष्टी म्हणजे पर्यावरण ह्या मधल्या दोन टप्प्यांचा विचार व आचार करताना दिसत नाहीत. परिणामी समाजात वावरताना व्यक्तीने व्यापारी म्हणून, व्यवस्थापक म्हणून, कामगार म्हणून, किंवा कर्मचारी म्हणून, ग्राहक म्हणून कसे वागावे, कोणत्या मूल्यांचा आधार घ्यावा याची शिकवण दिली जात नाही. हे सारे आपोआप येईल असे गृहीत धरण्यात येते. व्यवस्थापकही त्यांच्या प्रशिक्षणात हा मूल्यविचार रुजवताना दिसत नाहीत. हे सारे आपोआप होत नाही. त्यासाठी सतत प्रशिक्षणाची गरज असते. हे काम धार्मिक संस्था करू शकतात व परदेशात करतात, पण त्याची सोय भारतीय विचारवंतांनी केलेली नाही. त्यामुळे सदाचाराची भावना, राष्ट्रीयत्वाची भावना कायदे करून, घटनेचे पुस्तक बनवून निर्माण होईल या खोट्या आशेवर सारे चाललेले आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू २५