आहेत. त्यातल्या आध्यात्मिक संकल्पना समान आहेत. ही एकता ही आपली मोठी शक्ती आहे. सार्वभौम एकछत्री राजसत्ता नसली तरी श्रद्धास्थाने, आचार्यपीठे, यात्राक्षेत्रे यांच्यामुळे समान आध्यात्मिक सार्वभौमत्व भारतात हजारो वर्षे आहे. शाश्वत समाज म्हणून टिकण्याला ही सांस्कृतिक एकात्मता मोलाची ठरली आहे.
४.०३ जर या देशी भाषा खुरटल्या, तरुण माणसे इंग्लिशमध्ये विचार करू लागली तर त्यातून येणारी सांस्कृतिक गुलामगिरी ही गेल्या हजार वर्षांच्या राजकीय गुलामगिरीपेक्षा खोलवर तोडणारी, मुळांचा छेद घेणारी असेल. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हेच एकमेव ईप्सित त्यांच्यासमोर असेल.
भारतीयत्व हे नुसते एथ्निक फॅशन्स पुरते, फॅन्सी ड्रेसपुरते शिल्लक राहील. ही कल्पना मला भयानक वाटते. त्याहून भयानक म्हणजे ह्या छेदामुळे विचारक्षमताच खुंटून जाईल.
४.०४ ही आत्मविस्मृती घालवण्यासाठी भारतीय व्यवस्थापकांनी भारतीय मूलाधारावर आधारलेली व्यवस्थापनाची तंत्रे विकसित करायला हवीत, ती वापरायला हवीत. अशी दणकट क्षमता मिळवायला हवी की पाश्चात्य विज्ञान- तंत्रज्ञानाचे ज्ञान पचवण्याची (किंवा हलाहल पचवणाऱ्या 'नीलकंठा'ची) क्षमता
कमावायला हवी. पाश्चात्यांच्या चुकांपासून शिकायला हवे. दोन उदाहरणे पुरेशी ठरावीत. अणुविज्ञान व अंतरिक्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान. आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी गेल्या पन्नास वर्षांत परकीय साहाय्याशिवाय, जिथून जे मिळेल ते मिळवून त्याच्या जोरावर आपली कौशल्ये वाढवली व क्षमता सिद्ध केली आहे. भारताने अणुबाँब बनवून दाखवला आहे. केव्हा, कसा, कुठे बनवायचा व वापरायचा हा निर्णय भारतीय नेतृत्वापाशी एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. अणुऊर्जा हाताळण्याचे तंत्रज्ञान व त्यातून वीजनिर्मिती, शेतमालाचे संरक्षण यांसारख्या गोष्टी आपण स्व-बळावर मिळवल्या आहेत.म्हणून तर इतर देश अणुऊर्जेच्या क्षेत्रात आपल्याशी करार करायला तयार झालेले दिसतात. पाश्चात्यांपासून आपण विज्ञान शिकलो व ती विद्या आपल्या देशासाठी वापरली. संगणकाच्या क्षेत्रात तर 'सॉफ्टवेअर'मध्ये जगभर आपले नाव आहे. सिलिकॉन व्हॅलीतली बरीचशी मुले देशी माध्यमाच्या शाळांतून शिकून पुढे गेली आहेत. महाकाय भारताला जी जगात किंमत निर्माण झाली आहे ती तंत्रज्ञानातल्या, विज्ञानातल्या या क्षमतेमुळे. प्रक्षेपणास्त्रे, अवकाशविज्ञान यांतली भारताची कामगिरी मोलाची आहे. हे सारे भारताने स्वबळावर कमावले आहे.
४.०५ जपान हा शेजारचा पौर्वात्य देश आहे. त्याने बौद्ध-विचाराचा