पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय चौथा


 ४.०१ स्वातंत्र्योत्तर काळात इंग्लिश माध्यमाच्या शाळांत जाणाऱ्यांची संख्या खेडापाड्यांतही वाढली आहे. धनिकांपासून कामगारांपर्यंत साऱ्यांना 'कॉन्व्हेंट स्कूल' म्हणजे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हवे आहे. यातून ही मुले इंग्रजी किती शिकतील, पाश्चात्य संस्कृतीतली श्रमप्रधानता, समानता, लोकशाहीवरची श्रद्धां हे चांगले गुण किती घेतील ते सांगणे कठीण आहे. पण या देशाच्या मूळ धाग्यापासून दुरावतील एवढे मात्र नक्की.

 ४.०२ या देशाचे जे संचित आमच्या देशी भाषांत, साहित्यात, कलाप्रकारांत आहे ते या नवशिक्षित मुलांपर्यंत पोचणार नाही. मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी शिवाजी, श्रीराम, हिमालय, गंगा, सिंधू, कावेरी, कन्याकुमारी यांचा विचार परकीय दृष्टीने करू शकत नाही. त्याबद्दल अनुदार उद्गार काढू शकणार नाही. कारण ते केवळ शब्द नाहीत तर त्यांच्याबरोबर अनेक संकल्पना जोडलेल्या आहेत. त्याला नकळत त्या मराठी भाषेच्या वापरातून त्याच्यापर्यंत पोचत असतात. ते नाळेचे नाते असते. ते तोडून वेगळे करता येत नाही. हे मोस्कतिक संचित या मातीशी इमान राखणारे आहे. या भूप्रदेशातल्या अन्य निशी नाते जोडणारे आहे. तुळसीदास, तुकाराम, कबीर, तिरुवल्लवर. नारायणगुरू, बसवप्पा, दासीमय्या, ज्ञानेश्वर, नरसी मेहता, मीरा यांचे विचार, आचार ओव्या, अभंग, विराण्या, वचने, दोहे, श्लोक हे सारे एका रसायनातले

सुरवंटाचे फुलपाखरू १९