पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधोरेखित करणे केवळ प्रादेशिक किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून नव्हे तर सर्व जगाची गरज म्हणून शोधणे ही या लिखाणामागची प्रेरणा आहे.

 ३.१७ व्यवस्थापन हे जागतिक आहे हे खरे, पण भारतीय मूलाधाराशी त्याचे नाते जोडणे जास्त बुद्धिगम्य, जास्त खोलात जाऊन विचार करणारे, जास्त लवचीक व जास्त विस्तार पावण्याची क्षमता धरण करणारे आहे. कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' हे शक्य कोटीत आणण्यासाठी ही पूर्वस्मृती जागृत ठेवणे आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने भारतीय व्यवस्थापन शास्त्रात त्याची ही पृथगात्मता दिसली व असली पाहिजे.

१८ सुरवंटाचे फुलपाखरू