पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान्य केलेले आहे. परमेश्वर सर्व घडवतो, तो जगच्चालक, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे. त्याने आखून दिलेली मूल्ये, त्याच्या आज्ञा या अनुल्लंघनीय आहेत. परमेश्वराच्या आज्ञा, मूल्ये, नीतिनियम हे जीजस या प्रेषिताद्वारे मानवाकडे पोचलेले आहेत. तो विचार बायबल या ग्रंथात समाविष्ट आहे. बायबल हा सर्व तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे. बायबलविरोधी विचार हे पाखंड आहे. बायबलचा अर्थ रोममध्ये राहणाऱ्या जीजसच्या वारसदाराने म्हणजे पोपने जसा लावला असेल तसा तो सर्व कातोलिकावर बंधनकारक आहे. प्रोटेस्टंट पोपचा हा अधिकार मानत नाहीत. पण त्यांनाही बायबलचा आधार मान्य आहे. ज्यू पंथाचे लोक बायबलमधल्या जुन्या कराराला मानतात व मोझेस या प्रेषिताला मानतात. तालमुडच्या ग्रंथाचा त्यांच्या विचाराला आधार आहे. मुसलमान पंथाच्या दृष्टीने कुराण हा सर्व विचाराचा आधार आहे. महंमद हा शेवटचा प्रेषित आहे. त्याने अल्लाकडून प्राप्त केलेल्या व अरेबिकमध्ये लिहिल्या गेलेल्या आज्ञा ह्या पूर्णतया अपरिवर्तनीय आहेत. त्यात कानामात्रेचासुद्धा बदल करण्याचा अधिकार कुणाला नाही. त्याच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकत नाही. त्यात सार्वकालिक मार्गदर्शन आहे. सारा तत्त्वविचार व माणसांचा आचार हा कुराणातल्या आज्ञेप्रमाणे होणे गरजेचे आहे. अन्य विचारांना 'असण्या'चाही अधिकार नाही.
 ३.१२ मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या पंथांचा किंवा शेमेटिक धर्मांचा पाया त्यांच्या किताबांबद्दलचे अपरिवर्तनीयत्व आणि मोझेस, जीजस, व महंमद यांचे प्रेषितत्व यांच्या मान्यतेवर आधारित आहे. या लोकांच्या संस्कृतीचे पायाभूत विचार हे बायबल, कुराण, किंवा कुठला ना कुठला ग्रंथ या चौकटीत बद्ध आहेत. हे पंथ परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये स्पष्ट फरक मानणारे द्वैती आहेत. त्यांची चौकट ग्रीको रोमन विचाराप्रमाणे बरोबर।चूक, खरेखोटे, न्याय।अन्याय, अशा प्रत्येक गोष्टीचे वर्गीकरण दोन गटात करण्याची आहे. ते विचारही पुन्हा त्यांच्या त्यांच्या किताबातल्या उत्तराप्रमाणे असण्याचा आग्रह आहे. तोच त्यांच्या साऱ्या समाजविषयक धारणां पाया असतो. त्यालाच मोरॅलिटी असे मानले जाते. त्यांच्या या मूल्यकल्पना स्पष्ट आहेत. अनेक वर्षांच्या शिकवणुकीमुळे त्या घट्ट व कणखर बनलेल्या आहेत.

 ३.१३ एकोणिसाव्या शतकात जन्मास आलेल्या मार्क्सच्या कम्युनिस्ट पंथाचेही असेच एक आधारभूत पुस्तक आहे. त्यातला विचार धर्म ग्रंथांशी विरोधी असला किंवा त्याग्रंथांना 'अफूची गोळी' मानणारा असला तरी त्यात अंतिम सत्य आहे असा त्या पंथाच्या अनुयायांचा आग्रह आहे. या सर्व पंथांचे

१६ सुरवंटाचे फुलपाखरू