पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८.०६ आमच्या कंपनीत एकदा मंदकाम आंदोलन चालू होते.मी कंपनीतच राहात होतो.कंपनीच्याच बागेत माझी मुले खेळत.लोक दरवाजावर उभे राहून जोरजोराने घोषणा द्यायचे.'एवढे लोक कशाला? गोडबोलेच्या मढ्याला' अशी ही घोषणा त्यात असायची.माझी छोटी मुलगी ही सारी धामधूम बघायला गेटवर गेली.तिला थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर तिथल्याच पेरूच्या झाडावर चढून ती पेरू काढण्याच्या प्रयत्नात होती.ती खाली पडली.मी कंपनीच्या बाहेर गेलेला होतो.पण घोषणा देणाऱ्या लोकांनी झटपट आत येऊन तिला डॉक्टरकडे नेले,ड्रेसिंग करून आणले,तिला घरी आणून सोडले आणि ते परत त्याच घोषणा द्यायला गेटवर गेले! मला हे नंतर समजले.मी त्याच कामगारांचे दोन रोल्स हे अनुभवलेले आहेत.आरतीला उभे राहिल्यावर जितक्या सहजपणे लोक टाळ्या पिटत तेवढ्याच सहजतेने माझी मय्यत काढण्याची गोष्ट करत.हा रिच्युअलचा भाग आहे,हे एकदा समजले की मग काम करणे सोपे होते.
 १८.०७ सामाजिक व्यवहारात रिच्युअल्सचे महत्त्व आजकाल आपण कमी लेखतो,शिकलेली माणसे कर्मकांडाबद्दल तिटकारा दाखवतात.तीच रिच्युअलची गोष्ट झालेली आहे.मुळात ती सुद्धा आम्हाला कुठलीही गोष्ट शिस्तशीर करणे नको वाटते.मग ते बॅचकाई भरणे असो,पूजा करणे असो की वेळेवर सभा सुरू करून संपवणे असो.आमच्या कंपनीत दसऱ्याला पूजा असायची.आमच्या वर्क्स मॅनेजरना लोक आरतीचे ताट धरायला लावायचे व मग ज्या आरत्या सुरू करायचे त्या बराच वेळ चालायच्या.त्यांचे हात आरतीचे ताट फिरवून फिरवून दुखायला लागत. जणू कामगार लोक सगळ्या वर्षातला राग लोक असा काढायचे! हे लक्षात आल्यावर मी बुलेटिनमधून त्याबद्दल लिहिले व हा प्रकार जसा सुरू झाला होता तसा तो संपला.याबद्दल चार्जशीट,वॉर्निंग वगैरे काही शक्य नव्हते.
 १८.०८ कुठलीही सामाजिक किंवा सामूहिक कृती म्हटली की तिचा फॉर्म ठरून जातो.हा राग व्यक्त करण्याचा भाग आहे हे समजले की मग त्याच्यावरची उपायोजना वेगळी ठरते.संप करणे,काम बंद करणे,उपोषण करणे हा राग व्यक्त करायचा मार्ग आहे हे समजले की मग तो भले महात्मा गांधींनी पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध वापरलेला मार्ग असला तरी त्याला लोकशाहीत स्थान नाही हे भल्याभल्यांना समजत नाही.अनेक गांधीजनांनी विनोबा भाव्यांना याबद्दल धारेवर धरलेले होते.

 १८.०९ मुंबईसारख्या शहरात लग्नाची सारी व्यवस्था साधारणपणे

सुरवंटाचे फुलपाखरू १०९