पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'बियांड येस/नो:पो' या पुस्तकाचा भाग मोठा आहे.'येस' किंवा 'नो' या वर्गीकरणात आतले।बाहेरचे, इन्क्लुडेड।एक्स्लुडेड यांच्या सीमा किंवा भिंती स्पष्ट असतात.स्वच्छ विचार करताना त्याचा उपयोग असतो.मनातला,विचारातला गुंता स्पष्ट होतो.आपल्या चुका लक्षात येतात.जगातल्या घडणाऱ्या सर्व गोष्टी या आहे।नाही किंवा अरत्र वा परत्र इतक्या स्पष्टपणे वेगळ्या गटात घालता येत नाहीत.तार्किक उत्तर हे साऱ्यांचे एकच येणार पण प्रत्येकाचा संदर्भ,चौकट किंवा कॉण्टेक्स्ट वेगवेगळा असतो.त्याप्रमाणे त्याचे दर्शन त्यांना वेगळे होत असते.त्याने काढलेला अर्थ निदान त्याच्यापुरता खरा असतो.हे एकदा लक्षात आले व भारतातल्या प्रमुख षट्दर्शनांचे आणि मुळात एकाच सर्वकष तत्त्वज्ञानाऐवजी विविध दर्शनांचे महत्त्व माझ्या मनात ठसले.बोनोकडून विनोबांकडे येणे सोपे झाले.
 १७.०८ माझ्या आयुष्यातला अनलर्निंगचा हा प्रयास होता.शिक्षणामुळे एवढ्या काही चौकटी आपण आपल्या मनावर दाबून बसवतो की त्यापलीकडे काही जग आहे,त्या जगाला तसे असण्याचा अधिकार आहे,स्वातंत्र्य आहे हे आपण विसरून जातो.चूक। बरोबर यांचे घट्ट वर्गीकरण शिक्षणामुळे एवढे घटवले जाते,की या लर्निंगपासून अनलर्निंगपर्यंत पोचायला वेळ लागतो.
 १७.०९ विनोबा वाचताना,सु-राज्याची भीती स्वराज्यापेक्षा जास्त असते,कारण सु-राज्यामुळे आपण स्व-राज्यापासून दूर जातो व सुखासीन होतो हे समजायला कठीण असणारे प्रमेय होते,पण बोनो वाचल्यावर ते सोपे झाले.कामगार असे का वागतात यांतला संभ्रम संपला.मला तार्किक दृष्ट्या जी गोष्ट बिनतोड वाटते,ती माझ्या चौकटीस मान्यता दिली तरच बिनतोड असते.चौकट बदलली तर बिनतोड उत्तरे बदलतात हे समजायला बरीच वर्षे जावी लागली.
 १७.१० कामगार-व्यवस्थापन संबंधात या चौकटी फार त्रासदायक असतात.माणसे काम का करतात? पैशांसाठी, स्थैर्यासाठी,पोटासाठी,अन्य मार्ग नाही म्हणून ही वरवर पाहता पूर्ण उत्तरे वाटतात.प्रत्येकाची त्यासंबंधी ठाम धारणा असते.बऱ्याच वेळा त्याची वैयक्तिक भूमिका तो लोकांच्या ठिकाणी कल्पित असतो आणि तिथेच घोटाळा होतो.

 १७.११ माझा अनुभव असा आहे,की वर्गसंघर्षाची मालक-मजूर हे विरुद्ध पक्ष आहेत,त्यांच्यात वैरच असणार,त्यांत एकत्वाची भावना असणारच नाही हा-विचार जे कामगार म्हणजे नाहीरे-वाले आहेत त्यांच्यापेक्षा जे व्यवस्थापक आहेत,म्हणजे जास्त पगार घेणारे नोकर आहेत त्यांच्या मनात

सुरवंटाचे फुलपाखरू १०५