पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय पहिला


सुरुवात


 १.०१ भारतीय व्यवस्थापनशास्त्राचा वेगळेपणा शोधण्याच्या माझ्या प्रयत्नांना सुरुवातीची प्रेरणा एका अभ्यासवर्गाने झाली. फाऊंडेशन फॉर इंटिग्रल मॅनेजमेंट या संस्थेने ८ मार्च १९९२ ते १३ मार्च १९९२ या सहा दिवसांत अहमदपूर-मांडवी या दीव बेटाजवळच्या गुजरात सरकारच्या पर्यटक निवासात कार्यशाळा योजलेली होती. तीत भाग घेण्याची संधी गुजरात अंबुजा आणि एक्सेल इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मला मिळाली.
 १.०२ आम्ही सतराजण त्यात सहभागी होतो. कार्यशाळेचे प्रमुख संयोजक प्रा. एस् के चक्रवर्ती हे कोलकात्याच्या 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट' मधले प्राध्यापक होते. कार्यशाळेचा मुख्य आधार 'मॅनेजमेंट बाय व्हॅल्यूज' हे प्राध्यापक चक्रवतींचे पुस्तक व रवींद्रनाथ ठाकर. योगी अरविंद आणि विवेकानंद यांची भारतीय विचारधारेसंबंधीची मते हा होता. त्यांनी मांडलेल्या विचारांच्या अनुषंगाने अभ्यासवर्गात चर्चा झाली.

 १.०३ या कार्यशाळेचा दुसरा विशेष म्हणजे मौन या संकल्पनेचा जास्तीत ही सर्वजण सकाळी एकत्र जमत असू. सर्वांनी पांढरे कपडे वापरायचे असा नियम होता. बैठकीची सरुवात 'वंदे मातरम'ने व्हायची. शेवट 'जनगणमन'ने व्हायचा. आद्य शंकराचार्यांचे 'निर्वाणषटकम' म्हणन सहा कडव्यांचे गीत आहे. ते प्रथम टेपरेकॉर्डरवर वाजवले जायचे. त्यानंतर प्रत्येक सहभागी माणसाने मनाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न व्यक्तिशः काही वेळ करायचा

सुरवंटाचे फुलपाखरू १